आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : IND-SL टी20 मॅचमध्ये झाली एवढी मोठी चूक, कोणाच्याही लक्षात आली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉससाठी नाणे हवेत फेकताला श्रीलंकन कॅप्टन उपुल थरंगा. - Divya Marathi
टॉससाठी नाणे हवेत फेकताला श्रीलंकन कॅप्टन उपुल थरंगा.
स्पोर्ट्स डेस्क - भारताने श्रीलंकेला एकमेव टी 20 मॅचमध्ये 7 विकेटने पराभूत केले. भारताने टॉस जिंकल्यानंतर कैप्टन विराट कोहलीने म्हटले होते की, छोट्या फॉरमॅटमध्ये नेहमी नंतर बॅटिंग करणे फायद्याचे असते. तर श्रीलंकेच्या कर्णधाराने म्हटले होते, त्याने टॉस जिंकला असता तरी बॉलिंगच घेतली असती. या मॅचमधग्ये टॉसच्या वेळी एक मोठी चूक झाली होती. ती झाली नसती तर कदाचित सामना श्रीलंकेने जिंकला असता. मॅच रेफरीच्या चुकीमुळे टॉस हारल्यानंतरही टीम इंडियाने टॉस जिंकला. 

नेमके काय झाले.. 
- टॉससाठी श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगा आणि विराट कोहलीसह कॉमेंटेटर मुरली कार्तिक, मॅच रेफरी अँडी बायक्रॉफ्ट आणि टॉस रिप्रेझेंटिटिव्ह गौतम फील्डवर होते. 
- मुरलीने थरंगाला नाणे फेकायला सांगितले आणि विराटने हेड्स कॉल केला. नाणे पडताच टेल्स असून भारताने टॉस जिंकल्याचे सांगितले. 
- हीच मोठी चूक होती. एक तर त्यांनी श्रीलंकेऐवजी भारताला टॉस जिंकवला आणि जेव्हा मुरलीने म्हटले की भारताने टॉस जिंकला तेव्हा मुरलीलाही अडवले नाही. 
- मुरलीने टेल्स न ऐकता केवळ इंडिया विन द टॉस ऐकले ही त्याची चूकच होती. बायक्रॉफ्ट यांच्या लक्षात चूक आली होती, पण ते मुरलीला थांबवू शकले नाहीत. 
 
मॅच समरी
श्रीलंकाः 170/7 (20 ओवर)
भारतः174/3 (19.2 ओवर)
 
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO
बातम्या आणखी आहेत...