आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षे मोठी तरूणीवर जडला होता या क्रिकेटरचा जीव, प्रपोज नाही करू शकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेंकटेश प्रसाद पत्नी जयंतीसमवेत... - Divya Marathi
वेंकटेश प्रसाद पत्नी जयंतीसमवेत...
स्पोर्टस डेस्क- माजी भारतीय क्रिकेटर वेंकटेश प्रसाद यांचा आज 47 वा बर्थडे (5 ऑगस्ट, 1969) वाढदिवस आहे. जवागल श्रीनाथसोबत भारतीय बॉलिंगला एका नव्या वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या प्रसादच्या पर्सनल लाईफबाबत फॅन्स खूप कमी जानतात. लाज-या नेचरचा असणा-या वेंकटेशने लव्ह मॅरेज केले आहे. मात्र, त्याला प्रपोज त्याच्या बायकोने केले होते. 9 वर्षांनी मोठी बायको जयंती...
- वेंकटेश प्रसादची पत्नी त्याच्यापेक्षा वयाने सुमापरे 9 वर्षांनी मोठी आहे.
- वेंकटेशचा जन्म 1969 मध्ये झाला होता. तर, जयंती 1960 मधील आहे.
- सुरुवातीला वेंकटेशची फॅमिली लग्नासाठी तयार नव्हती. मात्र नंतर तयार झाले.
- 22 एप्रिल, 1996 रोजी या जोडप्याने लग्न केले.
- वेंकटेशची पत्नी जयंती घटस्फोटिता असल्याचे त्यावेळी अनेक माध्यमांनी म्हटले होते.
- जयंती-वेंकटेशच्या लग्नाला आता 20 वर्षे झाली आहेत. त्यांना आता पृथ्वी नावाचा मुलगा आहे.
अनिल कुंबळेने घडवली होती भेट-
- वेंकटेश प्रसाद आणि जयंती यांची क्रिकेटर अनिल कुंबळेंनी घडवून आणली होती.
- कुंबळे टायटन कंपनीत जॉब करत होता. तेव्हा जयंती टायटन कंपनीत PRO होती.
- ही गोष्ट 1994 ची आहे. तेव्हा कुंबळे आणि वेंकटेश, दोघेही क्रिकेटमधील बडे स्टार नव्हते.
- या भेटीनंतर जयंतीनेच वेंकटेशला पहिल्यांदा प्रपोज केले होते. मात्र, तो नकार असे.
- स्टार क्रिकेटर नसल्या कारणाने वेंकटेश भविष्याबाबत व करिअरबाबत चिंतित होता त्यामुळे तो या नात्यापासून जपून होता.
- तर जयंतीला प्रसादचा स्वभाव खूपच आवडला होता. त्यामुळे ती त्याला नेहमीच फोन- मॅसेज करत राहायची.
- हळू हळू त्यांच्यात प्रेम वाढले. वेंकटेशसुद्धा क्रिकेटमध्ये स्थिरावला होता. अखेर वेंकटेशने जयंतीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वेंकटेशच्या करिअरमधील हायलाईट्स
- मे 2005 मध्ये क्रिकेमधून रिटायरमेंट घेतलेल्या वेंकटेश प्रसादने आयपीएलमध्ये टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे बॉलिंग कोच म्हणून काम पाहत आहे.
- 2001 मध्ये संघातून ड्रॉप झाल्यानंतर संघात परतण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र यश आले नाही. दुखापतीच्या कारणाने त्याचे करिअर लवकरच संपले.
- रिटायरमेंटनंतर जानेवारी 2006 मध्ये अंडर-19 क्रिकेट टीमचे बॉलिंग कोच बनला. टीम वर्ल्ड कपमध्ये रनर-अप राहिली.
- 2007 मध्ये वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर वेंकटेशला बांगलादेश दौ-यावर टीमच्या बॉलिंग कोचपदी नियुक्त केले.
- मात्र, ऑक्टोबर 2009 मध्ये कोणत्याही कारणाशिवाय बीसीसीआयने प्रसादला हटविले.
- वेंकटेशच्या नावावर 33 कसोटीत 96 विकेट तर 161 वनडे सामन्यात 196 विकेट्स आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, वेंकटेश प्रसादची पर्सनल लाईफबाबत मजेशीर माहिती....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...