स्पोर्ट्स डेस्क- बॉलिवूड अॅक्ट्रेस सागरिका घाटगे दिल्ली डेयरडेविल्सचा कर्णधार झहीर खान आणि त्याच्या टीमला चीयर करण्यासाठी पुन्हा पोहचली. शनिवारी रात्री दिल्लीत खेळल्या गेलेल्या दिल्ली डेयरडेविल्स आणि किंग्स इलेवन यांच्यातील सामन्यात सागरिका दिल्ली टीमला चीयर करताना दिसली. याआधी सागरिका 11 एप्रिल रोजी पुणे सुपरजाएंटविरूद्ध खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये दिसून आली होती. मॅचनंतर सागरिका झहीरला भेटण्यासाठी गेली होती. युवराजच्या लग्नात दिसले होते एकत्र...
-फिल्म 'चक दे इंडिया' मुळे लोकप्रिय झालेली सागरिका आणि झहीर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे तेव्हा समोर आले होते जेव्हा हे कपल क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नात दिसले होते.
- सागरिकाने झहीरसोबतच्या डेटिंगबाबत एका इंटरव्यू दरम्यान सांगितले होते की, खासगी बाबी सार्वजनिक ठिकाणी शेयर केल्या जात नाहीत. मी सध्या आनंदी आहे व माझ्याबाबत बाकी कोण काय विचार करत आहे त्याबाबत मला काहीही म्हणायचे नाही.
- दुसरीकडे, झहीरने सुद्धा या रिलेशनबाबत आतापर्यंत काहीही बोलण्याचे टाळले आहे.
- सागरिका दिल्ली टीमला चीयर करत होती. ती मॅच दिल्लीने पंजाबविरूद्ध 51 धावांनी जिंकली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेव्हा पहिल्या मॅच दरम्यान दिसलेले सागरिका आणि झहीरचे इंटरेस्टिंग Photos...