आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या हमरपेक्षा 31 पट अधीक महागडी आहे या स्टारची कार, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेवेदर त्याच्या 31 कोटी रुपयांच्या ‘कोनिगसेग सीसीएक्स’ सुपर कारसह - Divya Marathi
मेवेदर त्याच्या 31 कोटी रुपयांच्या ‘कोनिगसेग सीसीएक्स’ सुपर कारसह
स्पोर्ट्स डेस्क- बॉक्सिंगमध्ये अब्जावधी रुपये कमावणारा फ्लायड मेवेदर रिंग सोडल्यानंतरसुद्धा दर महिन्याला कोट्यवधी रुपये कमावत आहे. नुकताच त्याने आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. २३ फेब्रुवारी रोजी तो ४० वर्षाचा झाला. 
 
"मनी मेवेदर'नावाने सुप्रसिद्ध माजी अमेरिकन प्रोफेशनल बॉक्सरने आपल्या करिअरमध्ये ४९ फाइट लढल्या. या सर्वात त्याने विजय मिळवला. त्याने भरपूर पैसा कमावला. तो आतासुद्धा दरमहिन्याला मिलियन डॉलर (६ कोटी रुपये) कमावतो. माझ्या उरलेल्या जीवनात मी दर महिन्याला कोट्यवधी रुपये कमवू शकतो. यासाठी मला पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याची गरज नाही. मी काही "स्मार्ट इन्व्हेस्टमेंट' केल्या आहेत. यामुळे मला दरमहिन्याला जवळपास कोटी रुपये मिळतात. मी खूप शांतीने आपले जीवन जगतोय, असे तो म्हणाला. मेवेदर २६ अब्ज रुपये संपत्तीचा मालक आहे. फोर्ब्जच्या यादीनुसार २०१५ मध्ये मेवेदर सर्वाधिक पैसे कमावणारा खेळाडू होता. त्याने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय तो स्टार्टअप्ससाठी पैसे गुंतवणूक करतो.
 
मेवेदरने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. महागड्या गाड्या घर खरेदी केल्यामुळे त्याच्यावर टीकासुद्धा होत असते. त्याला थाटात जीवन जगण्याचा छंद आहे. मेवेदरला ३१ कोटी रुपयांची "कोनिंगसेग सीसीएक्स' सुपरकारसोबत पाहण्यात आले. या कारला मीडियाने "डायमंड ऑन व्हील्स' असे नाव दिले होते. या गाडीत बसून तो एनबीए बास्केटबॉल टीम लान्स एंजिल्स लेकर्सचा सामना पाहण्यासाठी गेला होता. यादरम्यान १३ कोटी रुपयांचे घड्याळही घातलेले होते.
 
पुढिल स्लाईड्सवर पाहा, मेवेदरच्या नव्या कारचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...