आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लिश टी-२० स्पर्धा - मॅक्कुलमचा धमाका, ठोकले ११ षटकार, १३ चौकार !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्कुलमने इंग्लिश टी-२० ब्लास्ट स्पर्धेत आपला काउंटी संघ वाॅर्विकशायरकडून अवघ्या ६४ चेंडूंत नाबाद १५८ धावांची तुफानी खेळी केली. त्याने डर्बीशायरविरुद्ध ४२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने ११ षटकार आणि १३ चौकारांच्या साह्याने एकूण १५८ धावा ठोकल्या. मॅक्कुलमने आयपीएल २००८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून ७३ चेंडूंत १५८ धावा ठोकल्या होत्या. त्याने आपल्याच विक्रमाची बरोबरी केली.
मॅक्कुलमची ही खेळी टी-२० मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी आहे. यापूर्वी आयपीएल २०१३ मध्ये वेस्ट इंडीजचा फलंदाज क्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी १७५ धावा ठोकल्या होत्या. मागच्या सत्रात ल्युक राइटने ससेक्सकडून खेळताना केलेला १५३ धावांचा विक्रम मॅक्कुलमने मोडला.

सामन्याच्या अखेरपर्यंत रोमांच
डर्बीशायरने सामन्यात नाणफेके जिंकून वाॅर्विकशायरला प्रथम फलंदाजी करण्यास बोलावले. वाॅर्विकशायरच्या टीमने २० षटकांत २ बाद २४२ धावा काढल्या. या टीमकडून ब्रेंडन मॅक्कुलमने १५८ तर वरुण चोप्राने ५१ धावांची खेळी केली. त्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या डर्बीशायरला १९.४ षटकांत १८२ धावाच काढता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार वास डर्सटनने ४३ तर हामिश रुदरफोर्डने ३९ धावांची खेळी केली. वाॅर्विकशायरकडून जोस पाईसडनने ५१ धावांत ४ विकेट, तर जितेन पटेलने २ गडी बाद केले.