आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश एअरवेजची गडबड, कुंबळेचे किट विसरले; क्रिकेटच्या भाषेत मागितली माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिजमधील सेंट किट्स येथील विमानतळावर अनिल कुंबळे दाखल झाले तेव्हाचा क्षण... - Divya Marathi
वेस्ट इंडिजमधील सेंट किट्स येथील विमानतळावर अनिल कुंबळे दाखल झाले तेव्हाचा क्षण...
सेंट किट्स- एका मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्याच दौ-यावर वेस्ट इंडिजमध्ये दाखल झालेल्या अनिल कुंबळेंसाठी दौ-याची सुरुवात चांगली नाही. गुरुवारी ते सेंट किट्स एअरपोर्टवर पोहचताच त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे किट गायब आहे. ब्रिटिश एअरवेजने यासाठी कुंबळे यांची माफी मागितली आहे. क्रिकेटच्या स्टाईलमध्ये ब्रिटिश एअरवेजने मागितली माफी...
- वेस्ट इंडिजमध्ये दाखल होताच कुंबळेंच्या लक्षात आले की त्यांचे लगेज फ्लाईटमधून गहाळ झाले आहे.
- यानंतर काही वेळातच ब्रिटिश एअरवेजने याप्रकरणी क्रिकेटच्या भाषेत टि्वट करीत माफी मागितली.
- त्यांनी टि्वट केले की, ‘अनिल कुंबळेजी सॉरी! आम्ही तुमचे सामान सेंट किट्सवर देऊ (not out) शकलो नाही. तुमचे सामान गेटविक एअरपोर्टवर (caught behind) मिळाले आहे. जे लवकरच तुमच्यापर्यंत (bowl) पोहचेल.’
1984 मध्ये रद्द झाला होता सामना-
- याआधीही एअरवेजच्या चुकीमुळे खेळाडूंना असा सामना करावा लागला होता.
- 1984 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात जमशेदपुर येथे होणारा सामना रद्द करावा लागला होता. कारण त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू तर पोहचले होते मात्र त्यांची किटच आली नव्हती.
- तेव्हा त्यांचे लगेज कोलकात्याहून व्हाया रस्त्याने आणावी लागली होती.
9 जुलैला आहे सराव सामना-
- सेंट किट्स येथे दाखल झालेली भारतीय टीम 9 जुलैपासून येथील सराव सामन्याने दौ-याची सुरूवात करेल.
- येथे भारतीय टीम दाखल झाल्यानंतर अनेक खेळाडू एन्जॉय करताना दिसले. विमानतळावर सेल्फी, त्यानंतर बीच व्हालिबॉलसोबत त्यांनी येथील फूडचा आस्वाद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.
- चार कसोटी सामन्याची मालिका 21 जुलै पासून सुरु होईल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ब्रिटिश एअरवेजने क्रिकेटच्या अंदाजात टि्वट करून कशी मागितली माफी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...