आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

३७ वर्षांत ९०० रेटिंग गुण मिळवणारा पहिला भारतीय, अश्विन १० महिन्यांत अव्वल कसोटी गाेलंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वी दिल्ली- रविचंद्रन अश्विन १० महिन्यांत तिसऱ्यांदा अव्वल कसोटी गाेलंदाज ठरला. डिसेंबर २०१५ आणि जुलै २०१६ मध्येही तो अव्वल होता. यंदा त्याने ९०० गुण मिळवले आहेत. ३७ वर्षांत हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. गावसकर यांच्या नावे १९७९ मध्ये ९१६ गुण होते. गोलंदाजीत सर्वाधिक ८७७ गुणांची क्रमवारी कपिलदेवच्या नावे होती.
४५% विकेट मिळाले ४१ गुण
अश्विनने न्यूझीलंडच्या विरुद्ध २७ म्हणजे ४५% बळी घेतले होते. त्याला ४१ गुण मिळाले. तो
डेल स्टेन (८७८)व जेम्स अँडरसनला (८७०) मागे टाकत अव्वल ठरला.
नं. १ ऑलराउंडर बॅटिंग टॉप- ५० मध्ये
अश्विन अव्वल ऑलराउंडरही आहे. फलंदाजीत ५० व्या स्थानी. गंभीर (६८) व जडेजाही (७५) मागे. राहणे ६व्या, पुजारा १४ व्या स्थानी.

९०० वनडे खेळणारा भारत पहिला देश
भारत १६ ऑक्टोबरला धर्मशाळा येथे न्यूझीलंडच्या विरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना खेळेल तेव्हा ९०० वनडे खेळणारा पहिला देश ठरेल.
}८८७ वनडे खेळणारा ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी.
}८६६ वनडे खेळणारा पाकिस्तान तिसऱ्या स्थानी.
बातम्या आणखी आहेत...