गुजरातचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. जसप्रीतला संघात दुखापत ग्रस्त गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागेवर संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने सोमवारी ट्वीट करून ही घोषणा केली.
टी20 मालिकेसाठी हे खेळाडूही जाणार ऑस्ट्रेलियाला...
- जसप्रीतसिंह शिवाय आशीष नेहरा, युवराजसिंग, सुरेश रैना, हरभजनसिंग आणि हार्दिक पंड्या. हेदेखील टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग आहेत.
- हे सर्व खेळाडू 26 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या मालिकेसाठी 22 जानेवारीला रवाना होत आहेत.
- युवराजसिंग मोठ्या प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुणरागमन करत आहे. भारतीय संघ येथे तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळणार आहे.
सचिनकडून घेतल्या आहेत खास टिप्स
- जसप्रीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियंसकडून खेळतो. तो सचिनसह आयपीएल सामनेही खेळला आहे.
- आयपीएल-8 मध्ये तो अनेकदा सचिनकडून टिप्स घेताना दिसला आहे. सचिन या संघात मेंटर म्हणून काम करतो.
जसप्रीतचे क्रिकेट करिअर
फॉरमॅट | मॅच | विकेट | बेस्ट | अॅव्हरेज | इकोनॉमी | 4w | 5w |
First-class | 18 | 64 | 8/106 | 25.01 | 2.72 | 3 | 3 |
List A | 20 | 39 | 5/28 | 18.66 | 4.02 | 2 | 1 |
Twenty20 | 47 | 52 | 3/10 | 24.53 | 7.34 | 0 | 0 |
जसप्रीतची आयपीएल कारकिर्द
करिअर | मॅच | विकेट | बेस्ट | अॅव्हरेज | इकोनॉमी | 4w | 5w |
2015 | 4 | 3 | 1/38 | 61.33 | 12.26 | 0 | 0 |
2014 | 11 | 5 | 2/22 | 60.20 | 7.58 | 0 | 0 |
2013 | 2 | 3 | 3/32 | 23.33 | 10.00 | 0 | 0 |
पुढील स्लाइड्सवर पाहा, जसप्रीत बुमराहची बॉलिंग अॅक्शन...