आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"किंग कार्लोस'वर नजरा; अाज झुंजणार केेकेअार-दिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - टी-२०वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अविश्वसनीय असे सलग चार षटकार ठोकणारा वेस्ट इंडीजचा युवा क्रिकेटपटू कार्लाेस ब्रेथवेट एका आठवड्याच्या आत ईडन गार्डन स्टेडियमवर पोहोचला आहे. आता "किंग कार्लोस' दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करीत आहे. रविवारी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सपुढे यजमान कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. ही लढत सायंकाळी वाजता ईडन गार्डनवर रंगेल.
मागच्या रविवारीच ब्रेथवेट एका रात्रीत जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. फायनलमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्सला त्याने सलग चार षटकार ठोकून ब्रेथवेटने विंडीजच्या विजयाचा हीरो ठरला होता. ब्रेथवेट दिल्लीच्या संघात सामील झाल्याने डेअरडेव्हिल्सची टीम नव्या ऊर्जेसह मैदानावर उतरेल. ब्रेथवेटमुळे दिल्ली संघ मानसिकरीत्या केकेआरच्या तुलनेत अधिक मजबूत दिसत आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरपुढे ब्रेथवेटला रोखण्याचे आव्हान असेल.