आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 7 महिन्यातच झाला सेंचुरीचा विश्वविक्रम, पाहा कोन ठरले हिट, कोन झाले फ्लॉप?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 2015 हे साल संपायला अद्याप पाच महिने शिल्लक आहेत, पण वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सेंचुरीजचा नवा विश्वविक्रम निर्माण झाला आहे. 2015 मध्ये आतापर्यंत एकूण 80 सेंचुरीज फटकावल्या गेल्या आहेत. 80 वी सेंचुरी श्रीलंकेच्या कुशल परेराच्या नावे लिहिली गेली. त्याने पाकिस्तान विरूद्ध पाचवा वनडे मॅच खेळताना ही कामगिरी केली आहे. या वर्षात जगातील क्रिकेट खेळडूंनी केवळ 101 वनडे मॅचमध्येच 80 सेंचुरीज फटकावल्या आहेत.
मागील विश्वविक्रम तुटले:
2014 मध्ये एकूण 79 सेंचुरीज फटकावल्या गेल्या होत्या. मात्र 2015 मध्ये हा विश्वविक्रम जनेवारी ते जुलै या सात महिन्यातच तुटला. एखाद्या कॅलेंड वर्षात, ही सेंचुरीजची सर्वाधिक संख्या आहे. 2013 मध्ये वनडे सेंचुरीजची संख्या 77 होती. तर 2007 मध्ये एकूण 75 सेंचुरीज फटकावल्या गेल्या होत्या.
divyamarathi.com सांगत आहे, या वर्षी कोणत्या टीमच्या कोणत्या खेळाडूने फटकावल्या सर्वाधीक सेंचुरीज

श्रीलंकन खेळाडू आहेत आघाडीवर:
या वर्षात सेंचुरीजच्या बाबतीत श्रीलंकन फलंदाज आघाडीवर आहेत. 80 पैकी तब्बल 13 सेंचुरीज या केवळ श्रीलंकन फलंदाजांनी फटकावल्या आहेत. यात कुमार संगकारा टॉपवर आहे. ज्याने एकूण पाच सेंचुरीज लगावल्या आहेत. यापैकी चार सेंचुरीज तर त्याने वर्ल्डकप 2015 मध्येच ठोकल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा या वर्षात सेंचुरीज फटकावण्याच्या बाबतीत कोणता संघ आहे आघाडीवर आणि त्या संघाच्या कोणत्या खेळाडूने फटकावल्या किती सेंचुरीज​...