आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली, धोनीपेक्षा जास्त वेतन सीईओ जोहरींना! खेळाडूंपेक्षा सीईओ मालामाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) विराट कोहली, महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूंपेक्षा सीईओ राहुल जोहरी यांना अधिक वेतन दिले जात आहे. सुप्रीम कोर्टाने बोर्डातील शाही कारभार संपुष्टात आणल्यानंतर आता सीईअोच्या रूपाने नवी राजेशाही रुजत असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. 

राहुल जोहरी यांची सीईओ पदावर नियुक्ती करताना त्यांच्या कराराचा आणि मानधनाचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. जो नवी दिल्लीत अलीकडेच झालेल्या बीसीसीआयच्या अनौपचारिक बैठकीत उघड करण्यात आला.  

सुप्रीम कोर्टाच्या निकषांच्या पूर्ततेवर प्रश्नचिन्ह : सर्वोच्च न्यायालयाने शिफारशींत सीईओला क्रिकेटचेे ज्ञान व पार्श्वभूमी आवश्यक असल्याचे सूचित केले होते. दुहेरी हितसंबंधांच्या कलमाची जोहरी यांच्या नियुक्तीला बाधा येत नाही ना, आदी मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
जोहरींना ६ कोटी रुपये वेतन, बोनसही राहुल जोहरींना वर्षाकाठी ६ कोटी रुपयांच्या वेतनाचा करार झाला आहे. तसेच सीईओ म्हणून ते ज्या करारांवर सह्या करतील त्यात करार रकमेची अर्धा टक्का रक्कम बोनस मिळेल. ‘ओप्पो’ कंपनीशी झालेल्या करारात ०.५% रक्कम जोहरींना मिळाली.
 
स्टार खेळाडूंना वर्षाचे दाेन कोटी रुपयेच टीम इंडियाच्या अ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाकाठी ५ ते ७ मालिका खेळण्यासाठी मिळतात २ कोटी रुपये मिळतात. त्यात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचा समावेश आहे. ‘ब’ श्रेणीच्या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये, तर ‘क’ श्रेणीच्या खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपये वेतन मिळते.
बातम्या आणखी आहेत...