आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-BAN आज फायनलसाठी भिडणार, या 5 रेकॉर्ड्सवर राहील नजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफी 2017ची दुसरी सेमीफायनल भारत आणि बांगलादेशदरम्यान आज एजबेस्टनमध्ये दुपारी 2.30 वाजता खेळली जाणार आहे. टीम इंडिया फक्त फायनलमध्ये जाण्यासाठीच नव्हे तर किताबासाठीही प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे, बांगलादेशने चमत्कारिकरीत्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, टीम इंडियाला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. बांगलादेशाने न्यूझीलंडला रोमांचक सामन्यात 5 विकेटने हरवून त्यांना टुर्नामेंटच्या बाहेर केले होते. 
 
8000 धावा पूर्ण करणार विराट
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली वनडेमध्ये 8000 धावांच्या टप्पा गाठण्यापासून केवळ 88 धावा दूर आहे. या सामन्यात विराट हा रेकॉर्ड करू शकतो. तो सध्या फॉर्मात आहे आणि त्याने टुर्नामेंटमध्ये दोन अर्धशतकेही केलेली आहेत. विराटने हा रेकॉर्ड केल्यास तो भारतासाठी सर्वात जास्त धावा काढणारा 8वा फलंदाज ठरेल.

आयसीसी इव्हेंटमध्ये भारताला हरवले आहे बांगलादेशने
- आयसीसी इव्हेंटमध्ये भारत आणि बांगलादेशदरम्यान आतापर्यंत 6 सामने झाले आहेत. ज्यात 5 टीम इंडियाने जिंकले आणि एका सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला. हा सामना 2007च्या वर्ल्डकपचा होता. यामुळे टीम इंडिया वर्ल्डकपच्या पहिल्याच राउंडमध्ये बाहेर फेकली गेली.
 
वनडेमध्ये भारत Vs बांगलादेश रेकॉर्ड
एकूण सामने - 32
भारताने जिंकले - 26
बांगलादेशने जिंकले - 5
अनिर्णीत - 1
 
असे असू शकतात दोन्ही संघ
 
भारत
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), युवराज सिंह, एमएस धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
 
बांगलादेश
तमीम इक्बाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुश्फिकुर रहीम (यष्टिरक्षक), शाकिब अल हसन, मेहमुदुल्लाह, मोस्देक हुसैन, तस्कीन अहमद, मशरफे मुर्तजा (कर्णधार), रुबैल हुसैन, मुस्तफिजुर रहमान.
 
हेही जरूर वाचा

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूंच्या रेकॉर्डवर असेल नजर...
बातम्या आणखी आहेत...