आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०२१ ची चॅम्पियन्स ट्राॅफी असेल शेवटची?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अागामी २०२१ मध्ये हाेणारी चॅम्पियन्स ट्राॅफी ही शेवटची असण्याची शक्यता अाहे. कारण त्यानंतर ही स्पर्धा बंद हाेणार असल्याचे अायसीसीने संकेत दिले. पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीचे अायाेजन करण्यात अाले अाहे. त्यानंतर या स्पर्धेच्या अायाेजनाला पूर्णविराम मिळवणार असल्याचीही चर्चा अाहे. त्याच्या जागी अायसीसीच्या वतीने नव्या वनडे लीगचे अायाेजन करण्यात येईल. या लीगमुळे चॅम्पियन्स ट्राॅफीच्या अायाेजनाला बंद करण्यात येईल.

गत २०१३ च्या अायाेजनानंतरच चॅम्पियन्स ट्राॅफी बंद हाेणार असल्याची अाेरड हाेती. मात्र, सर्वाधिक उत्पन्न देणारी ही स्पर्धा अाहे. त्यामुळे अायसीसीने या स्पर्धेचे अस्तित्व कायम ठेवले. मात्र, अाता बऱ्याच टीकेनंतर या स्पर्धेच्या अायाेजनावर बंदी अाली अाहे. येत्या २०१९ नंतर वनडे लीगला सुरुवात हाेईल. या लीगमध्ये एकूण १३ देशांचे संघ सहभागी हाेतील. मर्यादित ५० षटकांच्या या लीगचे अाता नव्याने अायाेजन करण्यात येईल. यातून वनडेच्या लाेकप्रियतेचा अालेख उंचावण्याचा अायसीसीचा प्रयत्न असेल. पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये १ जूनपासून चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेला सुरुवात हाेणार अाहे. या स्पर्धेतून एकूण १५ सामने हाेणार अाहेत. १८ जूनपर्यंत ही स्पर्धा रंगणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...