आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी : सेमीफायनलमध्‍ये पाकचा सामना इंग्लंडशी; वुड, रशीदवर मदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्डिफ - रोमांचक विजयासह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघापुढे बुधवारी सेमीफायनलमध्ये अपराजित इंग्लंड क्रिकेट संघाचे मजबूत आव्हान असेल. हा सामना कार्डिफला खेळवला जाईल. याच मैदानावर झालेल्या मागच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला हरवले होते.  
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘अंडरडॉग’ म्हणून पुढे आलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाने भारताविरुद्ध हायव्होल्टेज सामना गमावला होता. त्यानंतर मागच्या दोन्ही सामन्यांत पाकने विजय मिळवला. पाकने आधी द. आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमाने १९ धावांनी तर नंतर श्रीलंकेला ३ विकेटने मात दिली होती. या दोन विजयांनंतर पाकने सेमीत प्रवेश केला.   
 
मधली फळी चिंतेचा विषय :  धावांसाठी पाक संघ कर्णधार सरफराजशिवाय अझहर अली, फखर जमान यांच्यावर अवलंबून आहे. मधल्या फळीचे अपयश पाकसाठी चिंतेचा विषय आहे. स्टार खेळाडू शोएब मलिक मागच्या तीन सामन्यांत फ्लॉप ठरला. त्याने ११, १६ आणि १५ धावा काढल्या आहेत.
 
१२ पैकी ११ मध्ये विजय :   इंग्लंडने २०१५ वर्ल्डकपनंतर आतापर्यंत १२ वनडेपैकी ११  मध्ये विजय मिळवला आहे. इंग्लंड सुसाट फॉर्मात आहे.
 
जेसन रॉय सुपरफ्लॉप :  इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय तीन सामन्यांत अपयशी ठरला. त्याने बांगलादेशविरुद्ध १, न्यूझीलंडविरुद्ध १३ तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ धावा काढल्या. अॅलेक्स हेल्सही या स्पर्धेत अद्याप अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेला नाही.

पाकिस्तानची सकारात्मक बाजू
पाकिस्तानकडे मोहंमद आमेर, जुनैद खान, हसन अली, इमाद वसीम आणि मोहंमद हाफिजच्या रूपाने चांगले गोलंदाज आहेत. यात जुनैद आणि इमानचे प्रदर्शन चांगले झाले आहे.   

वुड, रशीदवर मदार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी ४ विकेट घेणारे मार्क वुड आणि आदिल रशीदवर गोलंदाजीची मदार असेल. याशिवाय जॅक बॉल, मोईन अली, लियाम प्लंकेट, स्टोक्ससुद्धा गोलंदाजीत महत्त्वाचे खेळाडू आहेत. यांचा सामना करणे पाक फलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल.

इंग्लंडची सकारात्मक बाजू  
कर्णधार इयान मोर्गन, बेन स्टोक्स, जो. रुट, जोस बटलर जबरदस्त फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेन स्टोक्सने १०२ धावा तर कर्णधार मोर्गनने ८७ धावा काढल्या होत्या.  

दोन्ही संघ असे
पाकिस्तान : सरफराज अहेमद (कर्णधार), अहेमद शहजाद, अझहर अली, बाबर आझम, फहीम अश्रफ, फकर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमान वसीम, जुनैद खान, मो. हफिज, शेएब मलिक, शादाब खान, मोहम्मद आमेर.

इंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जो. रुट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, जॅक बॉल, जोनी बेयरस्ट्रो, सॅम बिलिंग्स, आदिल रशिद, डेव्हिड विली, स्टिवन फिन.
बातम्या आणखी आहेत...