आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPLचा साइड इफेक्ट? चॅम्पियन लीग गुंडाळली, BCCI ने जाहीर केला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - सप्‍टेंबर-ऑक्‍टोबरमध्‍ये होणार्‍या चॅम्पियन लीग टी-20 (CLT 20) स्‍पर्धेवर बंदी घालण्‍याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आहे. CLT-20 स्‍पर्धेचे फॅन फॉलोइंग कमी होत आहेत आणि टीआरपी देखील प्रचंड कमी आहे. त्‍यामुळे स्‍पर्धेवर बंदी घालल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
BCCI संचालन परिषदेचा निर्णय
बुधवारी लीगच्‍या संचालन परिषदेने या स्‍पर्धेवरील बंदीचा निर्णय घेतला आहे. यामध्‍ये बीसीसीआयसह क्रिकेट साऊथ आफ्रिका (सीएसए) आणि क्रिकेट ऑस्‍ट्रेलिया (सीए) यांचा सहभाग होता. 2009 मध्‍ये बीसीसीआय, सीएसए, आणि सीएने मिळून या चॅम्पियन लीग टी-20 ला सुरूवात केली होती.
बीसीसीआचे मत
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, 'जगातील क्रिकेटर्सना आपले कौशल्‍य दाखवण्‍यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म होता. पण या स्‍पर्धेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सर्व व्यावसायिक भागिदार आणि जे लोक यामध्‍ये सहभागी होते. त्‍यांचा सल्‍ला घेऊनच स्‍पर्धा बंद करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.'

'चॅम्‍पियन टी -20 लीगनंतर अनेक टी-20 स्‍पर्धांना सुरुवात झाली. भारतात 'आयपीएल', ऑस्‍ट्रेलियामध्‍ये 'बीग बॅश लीग' आणि साऊथ आफ्रिकेत 'रॅम स्‍लॅम टी- 20' असा स्‍पर्धा सुरु झाल्या, असेही बीसीसीआयने म्‍हटले आहे.