आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL चा परिणाम? अखेर चॅम्पियन्स लीग बंद! BCCI म्हणाले- ना पैसा मिळाला ना प्रेक्षक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुरुवातीला मुंबई इंडियन्स आणि नंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा ग्लेन मॅक्सवेल चॅम्पियन्स लीगमध्ये हॅम्पशायरकडून खेळला. - Divya Marathi
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुरुवातीला मुंबई इंडियन्स आणि नंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा ग्लेन मॅक्सवेल चॅम्पियन्स लीगमध्ये हॅम्पशायरकडून खेळला.
मुंबई - गेले अनेक दिवस आचके देत असलेली चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा अखेर बंद करण्याचा निर्णय स्पर्धेच्या गव्हर्निंग कौन्सिलने बुधवारी घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआयच्या कौन्सिलमधील प्रतिनिधींनी हा निर्णय घेतला. भारतासारख्या क्रिकेटप्रेमींच्या देशातही ही स्पर्धा लोकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरली होती. त्यामुळे २०१५ मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणारी स्पर्धाही आता होणार नाही.
यासंदर्भात माहिती देताना बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, "गेल्या सहा हंगामांत या स्पर्धेमुळे जगातील अनेक खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी व व्यासपीठ मिळाले होते. मात्र, प्रत्यक्ष मैदानावर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात या स्पर्धेला अपयश आले होते. त्यामुळे या स्पर्धेशी निगडित असलेल्या सर्व व्यावसायिक भागीदार आणि संघांशी सल्लामसलत करूनच स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.'

जगात सर्वत्र २०-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या लोकप्रिय स्पर्धा सुरू असताना ही स्पर्धा त्यांच्या आव्हानात टिकू शकली नाही. भारतात आयपीएल, ऑस्ट्रेलियात बिग बॅश आणि दक्षिण आफ्रिकेत रॅम स्लॅम-टी-२० अशी त्या त्या देशांमधील लोकप्रिय स्पर्धांचे चॅम्पियन्स लीगला आव्हान होते.
या स्पर्धेच्या तहकुबीमुळे निर्माण झालेली क्रिकेट कॅलेंडरमधील पोकळी भरून काढण्यासाठी अन्य छोट्या स्पर्धांचा विचार सुरू आहे. भारतात या स्पर्धेच्या जागी मिनी आयपीएल सुरू करण्याचा विचार सुरू होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने दोन फ्रँचायझी व त्यांच्या मालकांना केलेल्या शिक्षेमुळे हादरलेल्या बीसीसीआयला सध्या मिनी आयपीएलचा विचार गुंडाळून ठेवावा लागणार आहे. २००८ पासून चॅम्पियन्स लीगच्या आयोजनात अनेक अडथळेही वारंवार येत होते. इंग्लिश क्रिकेट हंगामाचे आव्हान, पाक, श्रीलंका, न्यूझीलंड यांच्या क्लब चॅम्पियन्सना थेट प्रवेश नाकारणे आणि आर्थिक यश प्राप्त न झाल्यामुळे या स्पर्धेला अपेक्षित यश मिळाले नाही.

आता पुढे काय ?
{ बहुदा आता मिनी आयपीएलचे आयोजन होईल. बीसीसीआयने खूप आधीच या स्पर्धेच्या जागी मिनी आयपीएलचे संकेत दिले होते.
{ मिनी आयपीएलमध्ये टॉप-४ संघात लीग होऊ शकते. मात्र, यात विदेशी संघ नसतील.
{ दोन समूहात संघांना विभागून स्पर्धा होऊ शकते.
{ सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यासाठी एखाद्या विदेशी संघाला आमंत्रित केले जाऊ शकते.
विजेत्या संघाला १६ कोटी
{
चॅम्पियन्स लीगच्या विजेत्या संघाला १६ कोटी रुपये मिळायचे. स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम ३८ कोटी इतकी होती.
{चॅम्पियन्स लीग क्वालिफाय करणाऱ्या संघाला प्रायोजकाकडून १ कोटी रुपये लगेचच मिळत असे.
{स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचीही कमाई व्हायची. मात्र, प्रेक्षकांचा पाठिंबा स्पर्धेला मिळाला नाही.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, बंद होण्याची कारणे
बातम्या आणखी आहेत...