Home »Sports »From The Field» Chandimals Century; Sri Lanka Scored 419 Runs In The First Innings

चांदिमलचे शतक; श्रीलंकेचा पाकसमाेर धावांचा डाेंगर; श्रीलंकेच्या पहिल्या डावात 419 धावा

कर्णधार दिनेश चांदिमलच्या (१३९) शतकी खेळीने श्रीलंका टीमची शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या दिवशी

वृत्तसंस्था | Sep 30, 2017, 03:00 AM IST

  • चांदिमलचे शतक; श्रीलंकेचा  पाकसमाेर धावांचा डाेंगर; श्रीलंकेच्या पहिल्या डावात 419 धावा
अबुधाबी-कर्णधार दिनेश चांदिमलच्या (१३९) शतकी खेळीने श्रीलंका टीमची शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या दिवशी चांदी झाली. याच शतकाच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या डावात पाकसमाेर धावांचा डाेंगर रचला. श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर सर्वबाद ४१९ धावांची खेळी केली. डिकवेला (८३), परेरा (३३) यांनीही संघाच्या धावसंख्येत माेलाचे याेगदान दिले. गाेलंदाजीत पाकचा अब्बास (३/७५) अाणि यासीर शहा (३/१२०) चमकले. त्यांनी धारदार गाेलंदाजी करताना लंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यापाठाेपाठ हसन अलीने (२/८८) दाेन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात पाकने दिवसअखेर बिनबाद ६४ धावा काढल्या. मसुद (३०) व समी (३१) मैदानावर खेळत अाहेत.

भारताविरुद्ध कसाेटी मालिकेतील पराभवातून सावरलेल्या श्रीलंंकेला अाता अबुधाबीमध्ये विजयाची अाशा अाहे. यातून लंकेने पाकविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यात दमदार सुरुवात केली. अाता पाकविरुद्ध कसाेटी मालिका जिंकून अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याचा श्रीलंकन टीमचा मानस अाहे.

श्रीलंकेने शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ४ बाद २२७ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. डिकवेलाने सकाळच्या पहिल्या सत्रात धडाकेबाज अर्धशतक ठाेकले. त्याने ६७ चेंडूंमध्ये सहा चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे शतक साजरे केले. याशिवाय त्याने अापली संयमी खेळी कायम ठेवली. याशिवाय त्याने चांदिमलसाेबत शतकी भागीदारी रचली. दरम्यान, डिकवेलला (८३) हसन अलीने त्रिफळाचित केले. यासह त्याने दुसऱ्या दिवशी पाकला पहिला बळी मिळवून दिला.
चांदिमल-परेराची अर्धशतकी भागीदारी : श्रीलंकेचा डाव सावरण्यासाठी दिनेश चांदिमलने कंबर कसली. त्याने तुफानी फटकेबाजी करताना धावसंख्येला गती दिली. यादरम्यान त्याला दिलरूवान परेराची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, परेराने ३३ धावांचे याेगदान दिले.
चांदिमल-डिकवेलाची शतकी भागीदारी
कर्णधार दिनेश चांदिमल अाणि डिकवेलाने संयमी खेळी करताना पाकची गाेलंदाजी फाेडून काढली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी संकटात सापडलेल्या श्रीलंकेचा डाव सावरला. यादरम्यान डिकवेलाने अर्धशतकाचे याेगदान दिले.
चांदिमलचे नववे शतक
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदिमलने शानदार खेळी करताना शतक ठाेकले. त्याने ३७२ चेंडूंचा सामना करताना १४ चाैकारांच्या अाधारे १५५ धावांची नाबाद खेळी केली. त्याचे हे कसाेटी करिअरमधील नववे शतक ठरले. याच शतकाच्या अाधारे त्याने धावसंख्येचा अालेख उंचावला. त्याची खेळी महत्वाची ठरली.

Next Article

Recommended