आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई, राजस्थानच्या जागी कोची, अहमदाबाद?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -माजी मुख्य न्यायाधीश जस्टिस आर. एम. लोढा यांच्या समितीने आयपीएल भ्रष्टाचारासंदर्भात चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघावर बंदी प्रकरणांवर चर्चा करून यापुढील योजना आखण्याकरिता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजीव शुक्ला यांना मदतीची कुमक म्हणून माजी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनाही मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात आले आहे. या दुपारी ३ वाजता मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात ही बैठक होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोची अहमदाबाद हे दोन नवे संघ पुढच्या आयपीएलमध्ये असू शकतील. कोची फ्रँचायजीसोबत बीसीसीआयाचा वाद सुरू असून, हा वाद टाळण्यासाठी कोचीला संधी मिळू शकते.

बैठकीचा ‘अजेंडा’ निश्चित नसला तरीही लोढा समितीच्या निर्णयांवर विचारविनिमय होईल व त्यानंतर दोन नव्या फ्रँचायझींबाबत चर्चा होईल, असे कळते. लोढा समितीने दोषी संघ व संघमालक यांच्या शिक्षेची शिफारस केली आहे. समितीला शिक्षा करण्याचा अधिकार नसल्यामुळे समितीच्या शिक्षेच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे काम बीसीसीआयला करावे लागणार आहे. त्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला अहवाल बीसीसीआयला सादर करावा लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...