आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेतेश्वर पुजारा दुसऱ्या स्थानी; गाेलंदाज रवींद्र जडेजा चमकला; अायसीसी कसाेटी क्रमवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- चेतेश्वर पुजाराने श्रीलंकेविरुद्ध कसाेटी सामन्यात संकटात सापडलेल्या यजमान भारतीय संघासाठी तारणहार म्हणून खेळी केली. त्याच्या याच उल्लेखनीय खेळीमुळे यजमान भारताला अापला पराभव टाळता अाला. याच दर्जेदार फलंदाजीमुळे त्याला अायसीसीच्या क्रमवारीमध्ये माेठी प्रगती साधता अाली. त्याने अायसीसीच्या कसाेटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. नागपूर कसाेटीत सुरेख खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजाने गाेलंदाजांच्या क्रमवारीमध्ये दुसरे स्थान गाठले.   


चेतेश्वर पुजाराने  करिअरमधील सर्वाेत्कृष्ट स्थान गाठले. अाता त्याच्या नावे ८८८ गुणांची नाेंद अाहे. त्याने क्रमवारीमध्ये दाेन स्थानांनी प्रगती साधली. दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने क्रमवारीतील अापले पाचवे स्थान कायम ठेवले. नुकतीच अायसीसीने कसाेटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा चेतेश्वर पुजारा चमकला. अाता त्याची नजर अव्वल स्थान गाठण्यावर लागली अाहे.   


मुरली विजय, राेहितची प्रगती

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात भारताचे चार फलंदाज चमकले. यादरम्यान त्यांनी शतकी खेळी केली. याच शतकामुळे त्यांना क्रमवारीत सुधारणा करता अाली. मुरली विजयला या शतकामुळे ८ स्थानांचा फायदा झाला. यातून त्याने २८ वे स्थान गाठले. तसेच राेहित शर्माने नाबाद शतकी खेळी केली. यातून त्याने ४६ वे स्थान गाठले.

 

काेहलीला टाकले मागे 

पुजाराने दुसऱ्या स्थानावर धडक मारून अापल्याच टीमचा कर्णधार विराट काेहलीला मागे टाकले. त्याने दुसरे स्थान गाठले. काेहली पाचव्या स्थानावर अाहे. याशिवाय त्याने रेटिंग गुणांत ८८८ ची कमाई केली. काेहलीच्या नावे ८७७ गुण अाहेत. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा,पुजाराला २२ गुणांचा फायदा...

बातम्या आणखी आहेत...