आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे चेन्नईतून कसोटी स्थलांतरित होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्यानंतर चेन्नईत होणारा भारत-इंग्लंडदम्यानचा पाचवा कसोटी सामना कोलकात्यात स्थलांतरित होऊ शकतो. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूत ७ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
भारत आणि इंग्लंड पाचवी कसोटी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर १७ डिसेंबरपासून होणे नियोजित आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हा सामना चेन्नईतून कोलकाता येथे हलवण्याच्या विचारात आहे. दक्षिण भारताची आणि चेन्नई शहराची स्थिती पाहता हा सामना स्थलांतरित होऊ शकतो. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे.
बातम्या आणखी आहेत...