आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायनाला उपविजेतेपद, चीनच्या ली झुईरुईला विजेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला एकेरीच्या उपविजेतेपदासह अभिवादन करताना भारताची सायना नेहवाल.
फुझहाेऊ- गत चॅम्पियन सायना नेहवालला चायना अाेपन बॅडमिंटन स्पर्धेच्या किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवता अाले नाही. जगातील माजी नंबर वन खेळाडूचे दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिने स्पर्धेत महिला एकेरीचे उपविजेतेपद पटकावले. अाॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या ली झुईरुईने एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात २१-१२, २१-१५ अशा फरकाने शानदार एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह चीनची खेळाडू ७००,००० डाॅलरच्या बक्षिसाची मानकरी ठरली. तिने ३९ मिनिटांमध्ये गत विजेत्या सायना नेहवालचे अाव्हान संपुष्टात अाणले. त्यामुळे सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दमदार सुरुवात करताना सायनाने पहिल्या गेममध्ये अाघाडी मिळवली हाेती. मात्र, तिला ही अाघाडी कायम ठेवता अाली नाही. सहाव्या मानांकित झुईरुईने सरस खेळी करून पहिल्या गेममध्ये २१-१२ ने बाजी मारली. यासह तिने लढतीमध्ये अाघाडी मिळवली. दरम्यान, पहिल्या गेममधील अपयशातून सावरलेल्या सायनाने पुनरागमनाचा जाेरदार प्रयत्न केला. मात्र, अाघाडीने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या झुईरुईने दुसरा गेमही जिंकला.

ली चाेंग वेई चॅम्पियन
पुरुष एकेरीत मलेशियाचा ली चाेंग वेई चॅम्पियन ठरला. त्याने अव्वल मानांकित चेन लाेगला धूळ चारली. त्याने ५० मिनिटांमध्ये एकेरीची फायनल जिंकली. बिगरमानांकित वेईने २१-१५, २१-११ अशा फरकाने विजय मिळवला. यासह यजमान चीनच्या लाेंगला अापल्या घरच्या मैदानावर पराभवाला सामाेेरे जावे लागले. तसेच ताे उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.