आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle Criticised For Pathetic Interview With Channel Ten’S Reporter

लाइव्ह मॅचमध्ये गेल रिपोर्टरला म्हणाला- तुझे डोळे फार सुंदर आहे, ड्रिंक घेशील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबॉर्न - महिला पत्रकारावर अभद्र कॉमेंट करणारा वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल पुन्हा एकदा महिला पत्रकारामुळे वादात अडकला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 लीगच्या बिग बॅशच्या एका सामन्यात 15 चेंडूत 41 रन्स केल्यानंतर जेव्हा रिपोर्टरने त्याला त्याच्या कामगिरीबद्दल विचारले, तेव्हा त्याने समाना संपल्यानतंर डेटवर जाण्याची आणि सोबत ड्रिंक्स घेण्याची ऑफर दिली.

गेल आणखी काय म्हणाला
- गेल जेव्हा शानदार खेळी करुन पॅव्हेलियनमध्ये पोहोचला तेव्हा चॅनल टेनची रिपोर्टर मेल मेकलॉघलिन त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आली.
- गेल म्हणाला, 'मी स्वतःहून तूला इंटरव्ह्यू देण्यासाठी येणार होतो. त्यासाठीच मी आजची खेळी केली. मला फक्त तुझे डोळे पाहायचे होते. ते फार सुंदर आहेत.'
- 'आशा आहे की आज मॅच जिंकल्यानंतर तू माझ्यासोबत ड्रिंग घेण्यासाठी येशील. आता एवढीही लाजू नको बेबी.'
- रिपोर्टरने त्याला उत्तर दिले, 'मी लाजत नाही.'

गेलच्या वक्तव्यानंतरच्या प्रतिक्रिया
- गेलची अशी वर्तणूक क्रिकेटर्स आणि चाहात्यांना रुचलेली नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफने गेलचे वक्तव्य निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, 'समाना संपल्यानंतर मुलाखतीत तो जे काही म्हणाला ते योग्य नव्हते. त्याने असे बोलायला नको होते.'
- ऑस्ट्रेलियाच्या फ्री लान्सर सिमन मास्टरस्टोन म्हणाली, 'मी ख्रिस गेलची मुलाखत पाहिली. ती पूर्ण अनप्रोफेशनल होती. लोकांना ही थट्टा वाटत असली तरी मेकलॉघलिनला तसे नक्कीच वाटले नसणार.'

- एबीसी रेडिओच्या स्पोर्टस् जर्नालिस्ट डेब्बी स्पिलाने म्हणाल्या, 'गेलचे स्टेटमेंट अतिशय वाईट होते. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य घाणेरडे होते. ते वक्तव्य पूर्णतः अनप्रोफेशनल होते.'

पुढील स्लाइडवर पाहा, गेलवर सोशल मीडियातून कसा झाला संताप व्यक्त