आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिस गेलने ठाेकलेे १२ चेंडूंत अर्धशतक, युवराजच्या विश्वविक्रमाची बराेबरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- विंडीजचा स्फाेटक फलंदाज क्रिस गेलच्या बॅटींमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडला. विंडीजच्या या दिग्गज फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठाेकण्याच्या युवराज सिंगच्या विश्वविक्रमाची बराेबरी साधली. त्याने युवीसारखेच १२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. टी-२० अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम अद्यापही युवराजच्या नावे अाहे. टी-२० क्रिकेटमध्ये हा विक्रम अाता युवराज सिंग अाणि क्रिस गेलच्या नावे संयुक्तपणे अाहे.
असे झळकले अर्धशतक : गेलने १२ चेंडूंत अर्धशतक ठोकले. गेलने लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून हा विक्रम केला. त्याने अॅडिलेड स्ट्राइकविरुद्ध हा भीम पराक्रम गाजवला. गेलने पहिल्या षटकातील शेवटच्या चार चेंडूंवर सलग षटकार ठाेकले. त्यानंतर ट्रेविस हेडच्या डावातील चाैथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून १२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
असे झाले अर्धशतक
गाेलंदाज : वेस्ट

०.१ : वाइड
०.२ : दाेन धावा
०.३ ते ०.६ : चार षटकार

गाेलंदाज : नेस्टर
१.६ : दाेन धावा
गाेलंदाज : लाॅफलिन
२.२ : षटकार (नाे बाॅल)
२.२ : षटकार
२.३ : चाैकार, २.४ : १ धाव
गाेलंदाज : हेड
३.१- षटकार