आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle Luxury Life And Costly Mansion In Jamaica

Bday SPL: 99 कोटींचा मालक आहे गेल, PHOTOS मध्ये बघा त्याचा आलिशान बंगला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल खासगी आयुष्यावरुन कायम चर्चेत असतो. 21 सप्टेंबर रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा झाला. परंतु, आधीच त्याच्या पार्ट्या सुरु झाल्या आहेत. त्याला पार्टी अॅनिमल म्हटले जाते. लाईफ एन्जॉय करणारा गेल 15 मिलियन डॉलर म्हणजेच 99 कोटी रुपयांचा मालक आहे. जमैकाला त्याचा लग्झरी बंगला आहे. तो बघितल्यावर तो किती भारी आयुष्य जगतोय याचा अंदाज येतो.
पर्वतावर आहे लग्झकी हाऊस
जमैकाच्या पर्वतावर गेलचे लग्झरी हाऊस आहे. या शहरातील टॉप टेन बंगल्यांमध्ये त्याचा समावेश होतो. तीन मजली या मॅन्शनमधून शहराचा अगदी जबरदस्त नजारा दिसतो. गेलच्या या पार्टी हाऊसमध्ये स्विमिंग पूल, डान्स फ्लोअर, थिएटर, बिलियर्ड्स रुम आदी सुविधा आहेत. गेल पार्टीची एकही संधी गमवत नाही. रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्टीजमध्ये तो कायम दिसतो. त्याने नुकतेच बंगल्यात स्ट्रिप पोल क्लब तयार केला आहे. गेल्या वर्षी त्याने बंगल्याचे अनेक फोटो शेअर केले होते.
इंस्टाग्रामवर झळकते लग्झरी लाईफ
क्रिस गेलची लाईफ फार रोमांचक आहे. तो प्रचंड फन लव्हिंग असल्याचे त्याचा इंस्टाग्राम अकाऊंटवरुन झळकते. पार्टीपासून मसाजपर्यंतचे आणि लग्झकी बंगल्यापासून कारपर्यंतचे फोटो या अकाऊंटवर दिसतात. बहुतांश फोटोमध्ये तो पार्टी करताना दिसतो. त्याला कॅरेबिअन आयलंडवर फिरायला आवडते. त्याचे मित्र त्याला ब्लेबॉय म्हणतात. स्टायलिश, फंकी ड्रेसस आणि घड्याळांचा तो शौकीन आहे. लग्झरी लाईफ एन्जॉय करणाऱ्या गेलला एक विचित्र शौकही आहे. हॉलिवूडच्या पॉप स्टार्सच्या पोस्टरसोबत फोटो काढणे त्याला आवडते. क्रिकेटव्यतिरिक्त तो गोल्फ खेळतो.
क्रिस गेलचे पर्सनल लाईफ फॅट्स
- 21 सप्टेंबर 1979 रोजी जमैकात जन्म. पूर्ण नाव क्रिस्टोफर हेनरी क्रिस गेल.
- हायस्कूलपर्यंत शिक्षण झाले. कॉलेज नाही केले.
- वडील डुडली गेल पोलिसात नोकरीला होते. आई सेल्सचा जॉब करायची.
- टॅट्यूसाठी क्रेझी. दोन्ही हातांवर टॅट्यू काढले आहेत.
- डान्सची हॉबिही आहे. डान्स करायचा एकही चान्स सोडत नाही. क्रिकेटच्या मैदानावरही डान्स करतो.
- सॉल्ट फिश त्याची आवडती डीश आहे.
पुढील स्लाईडवर बघा, क्रिस गेलची लग्झरी लाईफ....असा आहे त्याचा आलिशान बंगला...