आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle Said My Pockets Are Empty After Being Fined

जेव्हा लाखोंच्या फाइनने रिकामा झाला गेलचा खिसा, ब्राव्होला द्यावे लागले डिनरचे बिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल. - Divya Marathi
ख्रिस गेल.
मेलबर्न- महिला पत्रकारला फ्लर्ट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात आडकलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेटर ख्रिस गेलला लाखों रुपयांचा दंड भरावा लागला. परिणामी त्याचा संपूर्ण खिसा रिकामा झाला असून, त्याच्याकडे. डीनरचे बिल भरण्यासाठीही पैसे नाहीत. त्यच्या डिनरचे बिल त्याचा सहकारी क्रिकेटर ड्वेन ब्राव्होने भरले आहे. याचा खुलासा खुद्द गेलने ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर केला आहे.
ख्रिस गेलने असे केले ट्वीट...
- खिसा रिकामा झाला आहे. ड्वेन ब्राव्हो आज डिनरचे बिल देत आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या टी20 लीग बिग बॅशच्या दरम्यान एका महिला रिपोर्टरवर विवादित कमेंट केल्यामुळे. गेलला 10 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे 4.8 लाख रुपयांचा दंड भरावा लागला.
नेमके काय आहे प्रकरण...?
- गेल जेव्हा शानदार खेळी करुन पॅव्हेलियनमध्ये पोहोचला तेव्हा चॅनल टेनची रिपोर्टर मेल मेकलॉघलिन त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आली.
- गेल म्हणाला, 'मी स्वतःहून तूला इंटरव्ह्यू देण्यासाठी येणार होतो. त्यासाठीच मी आजची खेळी केली. मला फक्त तुझे डोळे पाहायचे होते. ते फार सुंदर आहेत.'
- 'आशा आहे की आज मॅच जिंकल्यानंतर तू माझ्यासोबत ड्रिंग घेण्यासाठी येशील. आता एवढीही लाजू नको बेबी.'
- रिपोर्टरने त्याला उत्तर दिले, 'मी लाजत नाही.'
- हा वाद वाढल्यानंतर गेलला माफीही माघावी लागली होती. एवढेच नाही तर त्याचा संघ मेलबर्न रेनगेड्सने त्याला फाइनही केले होते.
गेल ऑस्ट्रेलियात टी-20 बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. लीगमधील 5 सामन्यात त्याने 155 धावा केल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ख्रिस गेलचे ट्वीट आणि ऑस्ट्रेलियात फिरतानाचे त्याचे काही फोटोज...
................