आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle To Miss Two Matches In IPL Expecting First Child

IPL सोडून जमैकाला परतला गेल, गर्लफ्रेंड नताशा होणार आई, पाहा काय केले पोस्‍ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नताशासोबत गेल. IPL 2012 मधील हा फोटो आहे. - Divya Marathi
नताशासोबत गेल. IPL 2012 मधील हा फोटो आहे.
बंगळुरू - ख्रिस गेल आता पुढील दोन महिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मॅच खेळू शकणार नाही. तो आयपीएल मध्‍येच सोडून जमैकाला परतला आहे. गेलची गर्लफ्रेंड नताशा आई बनणार आहे. त्‍यामुळे तो जमैकाला परतल्‍याचे बोलले जात आहे. गेलने त्‍याचा एक फोटोही ट्विट केला आहे. त्‍याने लिहीले की, ‘ऑन माय वे, बेबी।’ जमैकाला पोहोचल्‍यानंतरही त्‍याने तेथील एक फोटो शेयर केला. नताशा भारतातही आली होती....
- जमैकामध्‍ये असल्‍याने गेल 20 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरोधात मॅच खेळू शकणार नाही.
- दुस-चा मॅचलाही तो उपस्‍थित राहण्‍याची शक्‍यता कमी आहे. 22 एप्रिलला पुण्‍याविरोधात दुसरी मॅच होणार आहे.
- 25 एप्रिलला तो पुन्‍हा संघात सहभागी होईल अशी अाशा व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.
- नताशा गेलसोबत आयपीएलसाठी 2012 मध्‍ये भारतात आली होती. तेव्‍हा ती काही IPL पार्टींमध्‍येही दिसली होती.
गेलची IPL-9 मधील कामगिरी....
- या सीजनच्‍या 2 सामन्‍यांमध्‍ये गेल फ्लॉप ठरला. तो आतापर्यंत 1 रन काढू शकला.
- पहिल्‍या मॅचमध्‍ये त्‍याने सनराइजर्स हैदराबाद विरोधात 1 रन काढला.
- दिल्ली डेयरडेव्‍हिल्सविरोधात त्‍याने भोपळाही फोडला नाही.
- त्‍याच्‍या या कामगिरीवर कर्णधार विराट म्‍हणाला की, ''गेलचा फाॅर्म ही चिंतेची बाब आहे.''
- ''पण मला विश्‍वास आहे की, संघाला गरज भासेल तेव्‍हा तो चांगली कामगिरी करेल.''
- त्‍याची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एक विजय आणि एका पराभवानंतर पाॅईंट टेबल चौथ्या नंबरवर आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, ख्रिस गेल आणि गर्लफ्रेंड नताशाचे फोटो... असे आहे क्रिस गेलचे आलिशान मॅन्शन... आधी या बंगल्यात करायचा मस्ती... आता येणार बाळाचा आवाज... याच बंगल्यात हलणार पाळणा....