टांटन (इंग्लंड) - वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलने आयपीएल पाठोपाठ 'नेटवेस्ट टी20 ब्लास्ट' मध्येही फटकेबाजी कायम ठेवली आहे. गेल आयपीएलमध्ये बेंगळुरूकडून तर या स्पर्धेत समरसेटच्या वतीने खेळतो. स्पर्धेच्या नावाप्रमाणेच गेलने केंटच्या विरोधात जोरदार ब्लास्ट केला. त्याने अवघ्या 62 चेंडुंमध्ये 10 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 151 धावा कुटल्या. मात्र तरीही त्याचा संघ 3 धावांनी पराभूत झाला हे विशेष. रन से हार गई।
45 चेंडुंमध्ये शतक
केंटच्या संघाने 20 षटकांत 228 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना गेलने आक्रमक फलंदाजी सुरू केली. अवघ्या 45 चेंडुंमध्ये त्याने शतक पूर्ण केले. त्यात 6 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. गेलच्या टीमचा पराभव जाला असला तरी, या तुफानी खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केंटच्या कर्णधाराचीही धुव्वाधार फलंदाजी
नाणेफेज जिंकत आधी फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या केंटच्या संघाने कर्णधार सॅम नॉर्थइस्टच्या तुफानी खेळीच्या जोरावर (114 धावा, 58 चेंडु) 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत 227 धावा कुटल्या. सॅमने त्याच्या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याशिवाय सलामीला आलेल्या ड्रुमोंडने 31 चेंडूत 51 धावा केल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संघाला विजय मिळवून देऊ न शकलेल्या अशाच काही मोठ्या खेळी...