आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लीन स्वीपचे प्रयत्न : दुसरा टी-२० सामना आज रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान रविवारी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा टी-२० सामना खेळवला जाईल. हा टी-२० सामना जिंकून झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याचे प्रयत्न टीम इंडियाचे असतील. भारताने वनडे मालिका ३-० ने जिंकली होती. आता टी-२० मालिका २-० ने जिंकून हा दौरा यशस्वी करण्यासाठी अजिंक्य रहाणेचे प्रयत्न असतील. भारतीय संघ टी-२० मालिकेत सध्या १-० ने पुढे आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवून भारतात परतण्याचा सर्वांचा प्रयत्न असेल.
भारताने पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींत समाधानकारक कामगिरी केली. मागच्या सामन्यात तब्बल सात खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले. यात भारताकडून स्टुअर्ट बिन्नी, केदार जाधव, मनीष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा यांनी पदार्पण केले. इतर दोन पदार्पण करणारे खेळाडू झिम्बाब्वेचे होते. मागच्या सामन्यात भारताकडून डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने ४ षटकांत १७ धावांत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. यापूर्वी वनडे मालिकेतही चांगली कामगिरी करणाऱ्या अक्षरकडून अखेरच्या टी-२० सामन्यात अशाच दमदार प्रदर्शनाची आशा असेल. भारताकडून मागच्या सामन्यात हरभजनसिंगनेही दोन गडी बाद केले होते. अखेरच्या टी-२० सामन्यात दमदार प्रदर्शन करून टीम इंडियातील आपले स्थान पक्के करण्याच्या इराद्याने हरभजन खेळेल.

भारताची उजवी बाजू
टीम इंडियाचे खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत चांगली कामगिरी करीत आहेत. भारतीय खेळाडू पूर्ण लयीत आहेत.
भारताने या दौऱ्यात एकही सामना गमावला नाही. यामुळे पाहुण्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास बुलंदीवर असेल.
भारताने आपल्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत दुय्यम दर्जाचा संघ झिम्बाब्वेत पाठवला. या खेळाडूंनीही झिम्बाब्वेला दणका दिला.

संजू सॅमसनला संधी?
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आणि भारताच्या अंडर १९ संघाचा खेळाडू संजू सॅमसनला या सामन्यात संधी मिळू शकते. संजू सॅमसन यष्टिरक्षक फलंदाज आहे. तो आक्रमक फलंदाज असून टी-२० साठी उपयुक्त आहे.

भारताच्या अडचणी
भारतीय फलंदाजांना अद्याप मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी.
रहाणे, उथप्पा, विजय, केदार यांना मोठी खेळी करावी लागेल.

झिम्बाब्वेही मजबूत
घरच्या मैदानावर झिम्बाब्वेला दुबळे लेखता येणार नाही. धक्कादायक निकाल देण्याची क्षमता या संघाकडे आहे.
चिभाभा, चिगुम्बुरा, हॅमिल्टन, मसकदजा हे खेळाडू एकहाती सामना फिरवू शकतात.
बातम्या आणखी आहेत...