आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Rio: अशी तोडली चीनची \'भिंत\'! गोपीचंदचे सिंधूला मिलिट्रीसारखे कठोर ट्रेनिंग!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅडमिंटनची फायनल झाल्यानंतर पी व्ही सिंधू आणि तिचे कोच पी. गोपीचंद... - Divya Marathi
बॅडमिंटनची फायनल झाल्यानंतर पी व्ही सिंधू आणि तिचे कोच पी. गोपीचंद...
रिओ- रिओ ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनला गोल्ड तर भारताच्या पी व्ही सिंधूला सिल्वर मिळाले. 2000 पासून ऑलिंपिकमध्ये प्रत्येक वेळी चीनचे शटलर फायनलमध्ये दाखल झाले होते. यंदा मात्र त्याला ब्रेक लावण्यात यश आले. यंदाचे मेन्स डबल्समधील गोल्ड चीनने जिंकले असले तरी महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये चीनला जाण्यापासून भारताने व स्पेनने रोखले. चीनची ही दणकट भिंत तोडण्याचे काम केले ते सिंधूचे कोच पुलेला गोपीचंद आणि मारिनचा कोच स्पेनचा फर्नांडो रिवास यांनी. चीनला धक्का दिल्याने या दोघांची खूप चर्चा होत आहे. रिवासने दहा वर्षापूर्वी शपथ घेतली होती की, चीनपेक्षा सरस खेळाडू मी तयार करेन. इकडे, गोपीचंदने एक वर्षापूर्वीच मिशन रिओची तयारी केली होती. सिंधूला अगदी कठोरातील कठोर असे मिलिट्री स्टाईल ट्रेनिंग त्यांनी दिले. अशक्य ते शक्य कसे बनवले या दोन कोचनी...
- बॅडमिंटन प्लेयर राहिलेल्या गोपीचंदने 8 वर्षापूर्वी घर गहाण ठेवून हैदराबादमध्ये बॅडमिंटन अॅकेडमी सुरु केली होती.
- काही लोक बोलायचे की चीनी खेळाडूंना भारतीय हरवू शकत नाहीत. मात्र हे आव्हान गोपीचंद यांनी स्वीकारले.
- 4 वर्षापूर्वी सायनाला लंडनमध्ये ब्राँझ मेडल मिळाले तर आता सिंधूला सिल्वर मेडल.
- गोपीचंदने एक वर्षापूर्वीच 'मिशन रिओ' तयारी सुरु केली होती. ते रिओत पहाटे 2 वाजता उठायचे.
- सिंधू आणि तिच्या विरूद्ध खेळाडूंचे व्हिडिओ पाहायचे व पुढच्या सामन्याची तयारी करायची.
- सिंधूच्या खाण्यापासून, फिरण्यापर्यंत व झोपण्याच्या वेळांपर्यंत बारकाईने नजर ठेवायचे.
वर्षभरापासून ऑलिंपिक तयारी

- गतवर्षभरापासून गोपीचंद यांनी सिंधू आणि श्रीकांतच्या ऑलिपिंक तयारीला प्रारंभ केला होता.
- त्यात त्यांच्यासाठी स्वतंत्र फिटनेस ट्रेनर, वेट ट्रेनर, फिजिकल ट्रेनरकडून विशेष प्रशिक्षण दिले गेले.
- कितीही मोठ्या रॅलीज झाल्या आणि तीन गेम्सपर्यंत सामने ताणले गेले तरी खेळाडू फिटनेसमध्ये कुठेही कमी पडू नयेत यासाठी ही विशेष तयारी करून घेण्यात यायची.
गोपीचंदचा शब्द म्हणजे कायदाच

- अत्यंत कडक आणि काटेकोर शिस्तीचे भोक्ते असलेल्या गोपीचंदचा शब्द म्हणजे सिंधूसाठी एखाद्या अलिखित कायद्यासारखाच असतो.
- सिंधूच्या खाण्यात कुणी काही मिसळू नये यासाठी ऑलिंपिकदरम्यान तिला गोपीचंदबरोबरच जेवण करण्याची स्पष्ट सूचना त्यांनी केली होती.
- या व्यतिरिक्त अन्नाचा एकही कण किंवा पाण्याचा थेंबही अन्यत्र कुठेही तिने खाऊ नये, अशी काळजीदेखील घेण्यात आली.

आणि सिंधूला मिळाला जोरात ओरडण्याचा गुरुमंत्र

- रिओ ऑलिंपिकमध्ये प्रत्येक गुण जिंकल्यानंतर सिंधू जोरात ओरडून तिचा आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसली.
- मात्र, यापूर्वी असे नव्हते. ती अत्यंत शांतचित्ताने खेळायची. परंतु, गोपीचंद यांनी तिच्यातील आक्रमकता वाढवण्यासाठी तिला गुण मिळवल्यानंतर जोरात ओरडण्याची सवय अंगी बाणवयला सांगितली.
- एके दिवशी गोपीचंदने सांगितले तुझ्यातील आक्रमकता मला पहायची आहे, जोरात ओरड. सिंधू प्रारंभी तयार नव्हती.
- सिंधू ओरडत नसल्याचे बघून गोपीचंदनी तिला सांगितले जोपर्यंत तू जोरात ओरडणार नाहीस, तोपर्यंत मी तुला रॅकेटला हात लावू देणार नाही. त्या क्षणी सिंधूला रडूच कोसळले.
- मात्र, गोपीसरांचा आदेश मानत तिने मोठ्या आवाजात हुंकार भरला. तेव्हापासून ती प्रत्येक गुण मिळाल्यावर जोरात ओरडून तिच्या गुणप्राप्तीचा आनंद व्यक्त करते.
पुढे वाचा, मारिनचा कोच रिवासने म्हटले होते, चीनपेक्षा जबरदस्त खेळाडू तयार करेन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...