आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन स्टार्सः गेल, मॅक्लुम आणि विराट, जाणून घ्या कोण आहे कुणापेक्षा सरस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अायसीसीच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर हाेण्याची नामुष्की टीम इंडियावर अाेढवल्याने काेहलीची विराट खेळी फारशी चमकली नाही. मात्र, तुफानी फटकेबाजीने काेहली हा या छाेट्या फाॅरमॅटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज असल्याचे स्पष्ट झाले. त्याने टी-२० च्या या छाेट्या फाॅरमॅटमध्ये अातापर्यंत सर्वाधिक १६ अर्धशतके ठाेकली. यामध्ये त्याने विंडीजचा स्फाेटक फलंदाज क्रिस गेल अाणि मॅक्लुमलाही पिछाडीवर टाकले.

क्रिस गेल अाणि मॅक्लुमने १५ डावांतील खेळीमध्ये १३ अर्धशतके अाणि दाेन शतकांचा समावेश अाहे. विराट काेहलीने यासाठी ४३ सामने, क्रिस गेलने ४९ अाणि मॅक्लुमने ७१ सामने खेळले अाहेत.

काेहलीने विश्वचषकात विंडीजविरुद्ध सामन्यात १८९.३६ च्या सरासरीने ४७ चेंडूंमध्ये ८९ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी सर्वाेत्कृष्ट ठरली. त्याने एक वेळ ३१ चेंडूंत ४४ धावा अाणि त्यानंतर त्याने १६ चेंडूंत ४५ धावा कुटल्या.

१४६ धावा सीमारेषेवरून विंडीजने केल्या : उपांत्य सामन्यात कॅरेबियन टीम सीमारेषेपार फटकेबाजी करण्यात यजमान भारतापेक्षा अधिक सरस ठरली. यातून विंडीज टीमने १४६ धावांची कमाई केली. मात्र, भारताला ९२ धावांची कमाई करता अाली. भारताने एक, दाेन वा तीन धावांमधून एकूण ९५ धावा काढल्या.
विंडीजविरुद्ध प्रथमच माेठी धावसंख्या
भारताने १९२ धावांच्या रूपात टी-२० विश्वचषकात अापली दुसरी अाणि विंडीजविरुद्ध पाच लढतींत अापली सर्वाधिक धावसंख्या उभी केली. मात्र, तरीही यजमानांना पराभवाला सामाेरे जावे लागले.
पुडईस स्लाइड्सवर जाणून घ्या, कोण आहे कुणापेक्षा कसा सरस....