आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Bangladeshi Photoshopped Image On Dhoni

बांगलादेशी बॉलरच्या हातात धोनीचे शिर असलेला फोटो VIRAL, शास्त्री भडकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीचे शिर असलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे. - Divya Marathi
धोनीचे शिर असलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
मिरपूर (बांगलादेश)- बांगलादेशी बॉलर तस्कीन अहमदच्या हातात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे शिर दाखविण्यात आलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. यापूर्वी अर्धे मुंडण केलेल्या भारतीय खेळडांचा फोटो व्हायरल झाला होता. हे दोन्ही फोटो फोटोशॉप करण्यात आले होते. यासंदर्भात टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री चांगलेच चिडले आहेत. आम्ही अशा फुटकळ गोष्टींवर विचार करत नाही, असा टोला यांनी लगावला आहे.
काय आहे वादग्रस्त फोटोत
- शास्त्री म्हणाले, की मी पेपर-वेपर वाचत नाही. केवळ क्रिकेट खेळतो.
- पेपर तुम्हीच वाचा. आमचे काम खेळणे आहे. खेळण्याच्या वेळी मी पेपर वाचत नाही.
- फोटोमध्ये बांगलादेशचा स्टार बॉलर तस्कीन अहमद महेंद्रसिंह धोनीचे शिर घेऊन दिसत आहे.
- या फोटोत येथील फॅन्सची मेंटॅलिटी दिसते असे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर भडकले भारतीय फॅन्स
- या फोटोबाबत भारतीय फॅन्सनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे.
- एका इंडियन फॅनने तस्कीनला आयएसआयचा समर्थक म्हटले आहे.
- 2015 च्या वनडे सिरिजनंतर भारतीय खेळाडूंवर वादग्रस्त जाहिरात छापून आली होती.
- बांगलादेशातील या घटनेवर भारतातून मोठा विरोध झाला होता. त्यानंतर वृत्तपत्राने माफी मागितली होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, 2015 मध्ये बांगलादेशी वृत्तपत्रात आलेली वादग्रस्त जाहिरात.... आताच्या इमेजवर भारतीय चाहत्यांनी व्यक्त केला राग....