आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी शास्त्री मूर्खांच्या जगात वावरत आहेत, गांगुलीचा टोला- वाचा आणखी काय म्हणाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळाला असला तरी त्याच्या निवड प्रक्रियेवरून उद्भवलेला वाद शांत होण्याची चिन्हे नाहीत. दावेदारांपैकी एक रवी शास्त्री दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते, माझ्या मुलाखतीच्या वेळेस सौरव गांगुली उपस्थित नव्हता. त्याची ही भूमिका अपमानजनक होती. आधी याबाबत गांगुलीने मौन बाळगले. मात्र, शास्त्रींचे हल्ले वाढल्यानंतर आता दादानेही पलटवार केला आहे.

सौरव गांगुली म्हणाला, ‘रवी शास्त्रींना त्या मुलाखतीची पूर्ण माहिती नाही. माझ्यामुळे त्यांचे प्रशिक्षकपद हुकल्याचे त्यांना वाटत असेल तर ते मूर्खांच्या जगात वावरत आहेत. अनिल कुंबळेंची नियुक्ती समितीचा सामूहिक निर्णय होता. जर मी त्यांच्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हतो, तर तेही कुठे उपस्थित होते. त्यांनी बँकॉकमध्ये सुटी साजरी करत असताना व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे नव्हे, तर बैठकीत येऊन प्रेझेंटेशन द्यायला हवे होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काय म्हणाला गांगुली...
- शास्त्रीं कोठे पडले कमी? काय झाली चूक...
बातम्या आणखी आहेत...