आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचा कोच कोहलीला विचारून ठरणार नाही : रॉय, नव्या कोचच्या निवडीत असेल पारदर्शकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीम इंडियाचा पुढचा कोच विराट कोहलीला विचारून निवडला जाणार नाही, असे बीसीसीआयचे कामकाज  बघत असलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद रॉय यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी रॉय यांनी कुंबळेच्या कामाची स्तुती केली. त्याची कारकीर्द शानदार होती. कुंबळे कुठेच दोषी नाही, असेही त्यांनी म्हटले.  

विनाेद रॉय म्हणाले, टीम इंडियाचा पुढचा कोच क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य  सचिन, सौरव गांगुली व लक्ष्मण पारदर्शकता ठेवून निवडतील. हे तिघे श्रेष्ठ कोच निवडण्यास सक्षम आहेत. कोचच्या निवडीत  कोहलीची भूमिका राहणार नाही.   

भारत-पाक द्विपक्षीय मालिका जरुरी नाही
द्विपक्षीय राजकीय संबंध दुरुस्त होत नसल्याने केंद्र भारत-पाक मालिकेला परवानगी देत नसेल तर आम्हीसुद्धा द्विपक्षीय मालिकेची गरज नाही,असे राॅय म्हणाले.

ठाकूरकडून कोहलीचे समर्थन: कर्णधार असला पाहिजे बॉस  
कर्णधार कोहली व कोच अनिल कुंबळे यांच्या वादात आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सुद्धा उडी घेतली आहे. संघ कर्णधाराचा असतो यामुळे कर्णधारच संघाचा बॉस असला पाहिजे, असे म्हणत अनुराग यांनी कोहलीचे समर्थन केले आहे.   

सर्वोच्च न्यायालयाच्या अादेशानंतर अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंतच मर्यादीत राहिले आहे. कोच आणि कर्णधार यांच्यातील वादात ठाकूर यांचे मत स्पष्ट आहे.  ठाकूर म्हणाले, “कोहलीवर विनाकारण दबाव निर्माण केला जात आहे. यासाठी विराट कोहलीला लक्ष करणे योग्य नाही. असे पहिल्यांदा घडलेले नाही. याआधी ग्रेग चॅपल यांना सुद्धा हटवण्यात आले होते. असे नेहमीच घडत आले आहे. कर्णधारच महत्त्वाचा असतो. 
बातम्या आणखी आहेत...