आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"आम्हाला हरवणे सोपे नाही', बांगलादेशचा कर्णधार मुर्तझाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - ‘आमच्या टीमला घरच्या मैदानावर पराभूत करणे साेपे नाही. भारताविरुद्ध मालिकेसाठी आम्ही उत्सुक आहोत. ही मालिका नावे करण्यासाठी आम्ही सज्ज झालाे आहाेत,’ अशी प्रतिक्रिया बांगलादेश टीमचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझाने दिली.

येत्या १८ जूनपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेला प्रारंभ हाेणार आहे. अव्वल भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेमुळे सध्या बांगलादेश टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तगडे आव्हान
‘बलाढ्य टीम इंडियासाेबत खेळण्यासाठी बांगलादेशचे खेळाडू उत्सुक आहेत. टीममधील सर्वच खेळाडूंकडून या मालिकेत माेठ्या खेळाची आशा आहे. भारतीय संघाचे तगडे आव्हान असेल, याची आम्हाला जाण आहे, असे मुर्तझा म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...