आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Express His Anger To Sell IPL Sponsorship To A Chinese Company VIVO

चिनी कंपनी VIVO पुन्हा बनली IPL स्पॉन्सर, इंडियन फॅन्सनी असा व्यक्त केला संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- चायनीज मोबाईल कंपनी 'वीवो' पुन्हा एकदा आयपीएल टायटल स्पॉन्सर बनला आहे. वीवोने 2199 कोटी रुपयांची बोली लावत पुढील पाच वर्षासाठी ही स्पॉन्सरशिप खरेदी केली आहे. एका चायनीज कंपनीसोबत ही डील केल्याने अनेक क्रिकेट फॅन्स नाराज झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर जाहीर आपली नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर क्रिकेट फॅन्स चायना बॉर्डरपासून ते पाकिस्तान प्रकरणी भारतविरोधी भूमिका घेतल्याने चीनशी नाराज आहेत. फॅन्सच्या म्हणण्यानुसार, एकीकडे चीन भारताविरोधात दररोज काहींना काही हरकत करत आहे, तर दुसरीकडे, बीसीसीआय, भारतीय क्रिकेटला चिनी कंपनीच्या हातात देत असे त्यांचे म्हणणे आहे. कारण IPL टायटल स्पॉन्सरशिपसोबतच भारतीय क्रिकेट टीमची जर्सी स्पॉन्सर सुद्धा एक अन्य चायनीज मोबाईल कंपनी 'ओप्पो' आहे.  

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, चायनीज कंपनीच्या स्पॉन्सरशिपनंतर सोशल मीडियात कसा फुटला क्रिकेट फॅन्सचा राग.....
बातम्या आणखी आहेत...