आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या टीमचा IPL मध्ये लाजीरवाणा विक्रम, सोशल मीडियात उडविली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 27th मॅचमध्ये रविवारी कोलकाता नाईटरायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 82 धावांनी हरविले. या मॅचमध्ये बंगळुरु टीम 49 धावांत ऑल आउट झाले. जे IPL च्या इतिहासात कोणत्याही टीमचा सर्वात कमी स्कोर ठरला. या मॅचमध्ये विराट कोहली तर शून्यावरच आणि ते ही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बंगळुरुचा लाजीरवाणा पराभव व लाजीरवाणा विक्रम नोंदवल्यानंतर सोशल मीडियात क्रिकेट फॅन्सने त्यांची जोरदार खिल्ली उडविली. लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत RCB ची जोरदार खेचली. असा राहिला मॅचचा रोमांच...
 
- मॅचमध्ये टॉस विराटने जिंकला व त्याने कोलकात्याला फलंदाजीला आमंत्रित केले. कोलकाताने 19.3 षटकात सर्वबाद 131 धावा केल्या. 
- कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक 34 धावा बनवल्या. शिवाय ख्रिस वोक्स (18), सूर्यकुमार यादव (15) धावा केल्या. 
- उत्तरादाखल बंगळुरूची सुरुवात एकदम खराब झाली. बंगळुरूचा पहिली विकेट विराटच्या रूपाने पहिल्याच षटकात पडली. 
- त्यानंतर बंगळुरूचे ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. त्यांची संपूर्ण 49 धावांत बाद झाली. 
- बंगळुरूच्या टीमचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, RCB च्या दारूण पराभवानंतर सोशल मीडियात आल्या या फनी कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...