आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Was On Fire To Rohit Sharma After India's Defeat In 4th ODI At Ranchi

रांचीतील पराभवामुळे फॅन्सचा खेळाडूंवर राग, रोहित निशाण्यावर, पाहा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सीरीजमधील चौथ्या मॅचमध्ये टीम इंडियाचा 19 धावांनी पराभव झाला. या मॅचमध्ये रहाणे आणि विराट सोडून एकही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही. यानंतर सोशल मीडियात फॅन्सचा राग दिसून आला. फॅन्सनी ज्या फलंदाजांनी धावा केल्या नाहीत त्यांना चांगलेच निशाण्यावर घेतले. खासकरून रोहित शर्माला सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले. काय काय आल्या कमेंट्स...
- चौथ्या वनडेत पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मावर सर्वात जास्त टीका झाली.
- या मालिकेत चार सामन्यात रोहितने आतापर्यंत 14, 15, 13 आणि 11 अशा धावा केल्या आहेत.
- याचमुळे नाराज फॅन्सनी सोशल मीडियात रोहितवर हल्लाबोल केला.
- एक फॅनने फिल्म शोलेचा फोटो शेयर केला. ज्यात ठाकुर रोहितला म्हणतोय, 'अगर तुम्हारे जितने चान्स मुझे मिले होते तो मैं भी 20-30 रन बना लेता'.
- एकाने ट्वीट केले की, 'विशाखापट्टनममध्ये होणा-या शेवटच्या पाचव्या मॅचमध्ये रोहितने जर 12 धावा कराव्यात. म्हणजे या मालिकेत त्याच्या नंबरची (11,12,13,14,15) सीरीज पूर्ण होईल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रांचीतील पराभवानंतर फॅन्सनी कोणत्या कोणत्या क्रिकेटर्सला केले लक्ष्य..
बातम्या आणखी आहेत...