आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनी देणार यूएईच्या युवांना क्रिकेटचे धडे; सुरू केली क्रिकेट प्रशिक्षण अकादमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- भारताच्या क्रिकेटला जागतिक स्तरावर नवीन अाेळख मिळवून देण्याची कामगिरी माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने केली. यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागील दाेन दशकामध्ये  अांतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे शिखर गाठून अापला वेगळा ठसा उमटवला. त्यामुळेच धाेनीची यशस्वी कर्णधार म्हणून अाेळख निर्माण झाली अाहे. अाता जागतिक स्तरावरचा यशस्वी कर्णधार म्हणून प्रसिद्ध असलेल्या धाेनीच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त अरब अामिरात (यूएई) येथील युवांना क्रिकेटचे धडे गिरवण्याची संधी उपलब्ध झाली अाहे.   
 
जागतिक दर्जाची अकादमी 
टीम इंडियाला दाेन वेळा विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवून देणाऱ्या धाेनीने यूएईमध्ये अापली क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू केली. यामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा येथील युवांना मिळणार अाहे. त्यामुळे या युवांना अापल्यातील प्रतिभेला चालना देण्याची माेठी संधी अाहे.  
 
खास प्रशिक्षकांचे मार्गदर्शन 
या क्रिकेट अकादमीमध्ये युवांना खास प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणार  अाहे. हे सर्व प्रशिक्षक भारतासह इतर ठिकाणावरून याठिकाणी दाखल हाेती. हे काेच येथे युवांना क्रिकेटचे तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देतील. या काेचिंग स्टाॅफमध्ये मुंबईच्या विशाल महाडिकचा समावेश अाहे. महाडिक या सर्वांचे नेतृत्व करणार अाहे.  
 
मी काेणत्याही टीकेचा विचार करत नाही 
जाणकार अाणि तज्ज्ञांकडून हाेत असलेल्या टीकांचा मी विचार करत नाही. मी अापल्या पद्धतीने क्रिकेटमध्ये १०० टक्के याेगदान देण्याचा प्रयत्न करेल. याला प्रचंड मेहनतीची जाेड असेल. यातून मला निश्चित माेठेे यश संपादन करता येईल. यश-अपयशाचा मी विचारही करत नाही, अशी प्रतिक्रिया धाेनीने टीकाकारांना दिली. गत सामन्यातील अपयशाने त्याच्या टीका हाेत अाहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, दुबईतील क्रिकेट अकॅडमीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...