आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 रोमांचक ODI, जबरदस्त शतक झळकावल्यावरही संघांनी खाल्ली माती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी पर्थ येथे झालेला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारताने गमावला. या सामन्यात रोहित शर्माने 171* धावांची शानदार खेळी करूनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र एखाद्या संघाच्या फलंदाजाने चांगली खेळी केली आणि तरी संघ हारला, असे पहिल्यांदाच घडले असे नाही. तर, या आधीही असे अनेक सामने झाले आहेत, ज्यात एखाद्या फलंदाजाने चांगली फलंदाजी करूनही ते संघाला विजयश्री मिळवून देऊ शकले नाही. त्यांच्या संघाने अखेर मातीच खाल्ली...
सचिनचे अविस्मरणीय शतक, तरी भारत हारला...
- 175 धावांची खेळी ही सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट आणि अविस्मरणीय शतकांपैकी एक असल्याचे सचिन स्वतः सांगतो. मात्र या सामन्यात भारताचा 3 धावांनी पराभव झाला होता.
- पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 350 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाक करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या सचिनने 175 धावांची खेळी केली होती.
- तो 48 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भारताच्या धावफलकावर 332 धावा झळकत असताना बाद झाला. त्यच्या रुपात भारताचा 7 गडी बाद झाला होता.
- तेव्हा लक्ष्यापासून केवळ 19 धावांनी मागे असलेला भारतीय संघ 347 धावांवर ऑल आउट झाला.
- सचिन सामन्यातील टॉप स्कोरर होता. ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्शने 112 आणि वाटसनने 93 धावा केल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, फलंदाजांच्या शानदार शतकानंतरही केव्हा केव्हा हारला त्यांचा संघ.

नोटः फलंदाजांची 145 वा त्याहून अधिक धवसंख्याच येथे देण्यात आली आहे.