आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेलच्या अगदी जवळचा होता हा क्रिकेटर, दरोडेखोरांनी लुटीनंतर गोळी झाडून केली हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट ऑफ स्पेन- त्रिनिदाद येथे काही दरोडेखोरांनी अॅन्ड्रियन जॉन नावाच्या एका इंग्लिश क्रिकेटरची गोळी झाडून हत्या केली. 22 वर्षीय अॅन्ड्रियन हा लंडन येथे ख्रिस गेलच्या क्रिकेट अॅकॅडमीमध्ये खेळत होता. तो गेलच्या फार जवळचा असल्याचेही बोलले जाते. या क्रिकेटरच्या हत्येनंतर गेलने ट्वीटच्या माध्यमाने दुःख व्यक्त केले आहे.
लुटीनंतर झाली होती हत्या....
- मिळालेल्या वृत्तानुसार रात्री उशिरापर्यंत अॅन्ड्रियन काही मित्रांची करमध्ये वाट पाहात होता.
- तेवढ्यात काही दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्याची लूट करून जातांना त्याच्यावर गोळी झाडी.
- या घटनेनंतर गेलने, ‘हे वृत्त अत्यंत दुःख दायक असल्याचे म्हटले असून, मी त्याच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. तो माझ्या अॅकॅडमीचा कर्णधार होता.’
एकाला अटक
- या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे.
- या आधी कश्मीरमध्ये नईम नावाच्या एका तरुण क्रिकेटरचा सैन्याची गोळी लागून मृत्यू झाला होता.
कर्णधार होता अॅन्ड्रियन
- अॅन्ड्रियन लंदनमध्ये ख्रिस गेलच्या क्रिकेट अॅकॅडमीसाठी क्रिकेट खेळत होता. तो तेथील संघाचा कर्णधार होता.
- गेल फाउंडेशनचे मॅनॅजर म्हणाले की, ‘एवढ्या चांगल्या व्यक्तीची कुणी हत्या केली. यावर विश्वासच बसत नाही. त्याची वेस्ट इंडीजमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्याची इच्छा होती.’

पुढीस स्लाइड्सवर पाहा, ख्रिस गेलचे ट्वीट आणि अॅन्ड्रियनचे काही खास Photos...
ख्रिस गेल आणि अॅन्ड्रियन जॉन (उडवीकडून).
बातम्या आणखी आहेत...