सुरेश रैनानंतर आता आणखी एक भारतीय क्रिकेटर लग्नाच्या तयारीत आहे. विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक हा स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकल हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. 2013 मध्ये या जोडीचा सारखपुडा झाला होता. आता यांच्या लग्नाची तारीखही जाहीर झाली असून, 18 आणि 20 ऑगस्टरोजी यांचे लग्न होणार आहे. दीपिका ख्रिश्चन कुटूंबातून आहे तर, दिनेश हिंदू आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा दोन्ही धर्मांच्या पद्धतीनुसार होणार आहे. कार्तिकचे हे दुसरे लग्न असून त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे.
दोन्ही धर्माच्या रिवाजानुसार सोहळा
कार्तिक आणि दीपिका दोन वेळा लग्न करणार आहेत. आधी ख्रिश्चन त्यानंतर हिंदू अशा दोन पद्धतीने या जोडीचे लग्न होणार आहे. अनुक्रमे दिनांक 18 आणि 20 ऑगस्टरोजी हे दोन्हीही सोहळे चेन्नईमध्ये होणार आहेत. दीपिकाचे वडील संजीव पल्लिकल यांनी माध्यमांना या विषयी माहिती दिली आहे.
2013 मध्ये साखरपुडा
कार्तिक आणि दीपिकाची ओळख फेब्रुवारी 2013 मध्ये झाली होती. याच वर्षी त्यांचा साखरपुडाही झाला. मात्र त्यानंतरही दोघांनी आपल्या संबंधांना समाजापासून दूर ठेवले. त्यामुळे या जोडीच्या चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची ओढ लागली आहे.
कार्तिकचे दुसरे लग्न
2007 मध्ये कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रीण निकितासोबत लग्न केले होते. कार्तिक आणि निकिता यांचे परिवारही एकमेकांना चांगले ओळखत होते. बालपणी ते दोघे सोबत खेळत असत. पुढे प्रेमकरणानंतर लग्नही झाले. मात्र, फार काळ हे नाते टिकू शकले नाही. 2012 मध्ये क्रिकेटर मुरली विजयसोबत निकिताचे अफेअर असल्याने कार्तिकने तिच्यापासून घटस्फोट घेतला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, कार्तिक-दीपिकाच्या साखरपुड्याचे फोटो..