आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Gudappa Vishvanathan Commented On Dhoni

धोनीला स्वत:चे भवितव्य ठरवण्याचा अधिकार, गुंडप्पा विश्वनाथ यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्वत:चे भवितव्य निश्चित करण्याचा अधिकार असल्याचे मत महान फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांनी व्यक्त केले.
सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या धोनीने क्रिकेटमध्ये बरेच काही कमावले आहे. त्यामुळे आणखी किती दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्याला असल्याचेही ते म्हणाले.

धोनीचा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळा फाॅर्म बघता तसेच कसोटीत त्याला जरा वेळाने सूर गवसत असल्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. मात्र, विश्वनाथ यांनी धोनीच्या निर्णयाची पाठराखण केली आहे.

निवृत्त होणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. यासाठी कोणालाही जबरदस्ती करता येणार नाही. तो परिपक्व खेळाडू असल्यामुळे नेमकी कोणत्या वेळी निवृत्ती घ्यायची याची त्याला जाण अाहे, असे ते म्हणाले.

कोहलीची स्तुती
विराटच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून फलंदाजीतही संघ उजवा असल्याचे मत गुंडप्पा विश्वनाथ यांनी व्यक्त केले. सामना जिंकण्यासाठी कोहली असा आक्रमक होत असेल तर यात काही गैर नाही, असे ते म्हणाले.