आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी हिच्यासोबत 10 वर्षे होते इरफानचे अफेयर, एका हट्टामुळे तुटले नाते!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरफान पठान आणि शिवांगी - Divya Marathi
इरफान पठान आणि शिवांगी
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कधी काळी स्टार बॉलर राहिलेला क्रिकेटर इरफान पठान आज 32 वर्षाचा (27 ऑक्टोबर, 1984) झाला आहे. लहानपणी बडोद्यातील लहान वजा झोपडीच्या घरात राहणारा इरफान आता स्टार आहे. क्रिकेटसोबत करियरच्या सुरुवातीला इरफान पठानने आपल्या अफेयरमुळेही खूप प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, आता त्याने मॉडेल सफा बेगसोबत निकाह केला आहे. 10 वर्षे चालले शिवांगीसोबत अफेयर...
- कधी काळी इरफान पठानच्या हद्यात ऑस्ट्रेलियाचे भारतीय राजदूताची मुलगी बसली होती. या राजदूताच्या शिवांगी नावाच्या मुलीसोबत त्याचे 10 वर्षे अफेयर चालले.
- पठान आणि शिवांगीटी पहिली भेट 2003 मध्ये अॅडलेडमध्ये झाली होती. डेटिंगचा हा सिलसिला हळू हळू वाढत गेला व दोघे जवळ आले.
- कॅनबेरात पोस्टेड असलेले एक भारतीय राजदूताची मुलगी शिवांगी चार्टड अकाउंटेंट होती. ऑस्ट्रेलियाचा दौरा संपताच इरफान पठान तेथेच थांबला होता.
- तेव्हाच या रिलेशनशिपचा खुलासा झाला होता. सांगितले गेले की, तेथे थांबण्याचे कारण शिवांगी हेच होते.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिवांगी इरफानसाठी भारतात सुद्धा आली होती. ती तीन वर्षे बडोद्यातही राहिली.
हट्टामुळे झाल्या वेगळ्या वाटा-
- इरफान आणि शिवांगी दोघेही लग्न करू इच्छित होते. मात्र, दोघांच्याही घरून विरोध होता. मात्र, नंतर काही काळानंतर त्यांना दोन्ही कुटुंबांनी होकार दिला मात्र दोघांतच अंतर वाढत गेले.
- सूत्रांच्या माहितीनुसार, इरफान पठानला वाटत होते की त्याचा मोठा भाऊ यूसुफ पठानचे आधी लग्न व्हावे मात्र, शिवांगीला थांबणे पसंत नव्हते.
- इरफान आपल्या म्हणण्यावर अडून बसला, त्यामुळे शिवांगीने 10 वर्षाचे नाते थांबविण्याचा निर्णय घेतला.

मॉडेल सफासोबत केला निकाह-
- इरफानची बेगम सफा बेग त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यांचा निकाह फेब्रवारी, 2016 मध्ये सौदी अरबमध्य़े झाला होता.
- सफा जेद्दाहमध्ये मॉडेलिंग करते. मात्र ती मूळ भारतीय आहे. ती एडिटोरियल मॉडेल म्हणून मिडिल ईस्टमध्ये फेमस आहे.
- ती फॅशन मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती. सध्या ती जेद्दा स्थित एका पीआर फर्ममध्ये काम करते.
- सफा प्रसिद्ध नेल आर्टिस्ट आहे आणि जेद्दाहमधील एका इंटरनॅशनल इंडियन स्कूलमध्ये शिकली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इरफान पठानची गर्लफ्रेंड राहिलेली शिवांगी, वाईफ सफा आणि इतर फॅमिली मेंबर्सचे फोटो...सोबतच जाणून घ्या सफा आणि इरफानची कुठे झाली होती पहिली भेट...
बातम्या आणखी आहेत...