आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Irfan Pathan Marriage With Safa On Valentine Day

पहिल्या भेटीतच शिवांगीवर फिदा झाला होता इरफान, एका हट्टाने वाढला दुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरफान आणि शिवांगी - Divya Marathi
इरफान आणि शिवांगी
क्रिकेटर इरफान पठाण व्हॅलेंटाइन डेला बडोद्याच्या सफासोबत निकाह करणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला तर, त्यांच्या लग्नाची खरेदीही सुरु झाली आहे. इरफानच्या आई-वडिलांनी भावी सुनेसाठी सुरतमधून दागिणेही खरेदी केले आहेत. याआधी इरफान आणि शिवांगीच्या अफेअरची बरीच चर्चा होती. ऑस्ट्रेलियामधील  भारतीय राजनयिक यांची कन्या शिवांगीसोबतच्या ब्रेकअपनंतर इरफान सिंगल होता. त्यांचे अफेअर जवळपास 10 वर्षे चालले. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे या चर्चित अफेअरबद्दल.

केव्हा झाला खुलासा...
इरफान आणि शिवांगीची पहिले भेट 2003 मध्ये अॅडिलेड येथे झाली होती. दोघांच्या गाठी-भेटी वाढल्या आणि ते मनानेही जवळ येऊ लागले. ऑस्ट्रेलियामध्ये राजनियक असलेल्या एका उच्चपदस्थाची कन्या शिवांगी स्वतः चार्टर्ड अकांऊटंट आहे. भारताचा दौरा संपल्यानंतरही इरफान ऑस्ट्रेलियात थांबला होता, तेव्हाच या रिलेशनशिपचा खुलासा झाला. इरफानसाठी शिवांगी भारतातही आली होती. तीन वर्षे ती बडोद्यात राहिली होती.

एका हट्टाने वाढले अंतर आणि...
इरफान आणि शिवांगी दोघेही लग्न करणार होते, मात्र त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांची त्याला संमती नव्हती. त्यांची या लग्नाला नाराजी जाणवत होती. मात्र, नंतर ते मान्यही झाले होते.  पण दोघांमध्ये 2012 मध्ये दुरावा वाढत गेला.

इरफानची इच्छा होती, की आधी त्याचा मोठा भाऊ युसूफचे लग्न व्हावे, तर दुसरीकडे शिवांगीला आता लग्नाला आणखी उशिर करायचा नव्हता. इरफान त्याच्या अटींवर अडून बसला तर, शिवांगीनेही लग्नाचा हट्ट धरला. यामुळे त्यांच्यात दुरावा वाढत गेला आणि 10 वर्षांचे नाते अखेर संपुष्टात आले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, इरफान आणि शिवांगीसह पठाण फॅमिलीचे फोटोज्..