आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर इशांतचा आज विवाह, प्रतिमाने काढली मेहंदी, युवी-हेजल आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहंदी लावलेली प्रतिमा... - Divya Marathi
मेहंदी लावलेली प्रतिमा...
वाराणसी- युवराज सिंग नंतर आता ईशांत शर्मा आज विवाह बंधनात अडकत आहे. आज सायंकाळी गुरगावमध्ये बास्केटबॉल प्लेयर प्रतिमा सिंगसोबत सात फेरे घेईल. त्याआधी प्रतिमाने इशांतच्या नावाची मेहंदी काढली. सायंकाळी सात वाजता इशांतची वरात निघेल त्यानंतर विवाह पार पडेल तर रात्री आठ वाजल्यापासून डिनर आहे. सिक्‍युरिटीच्या कारणाने पाहुण्यांना मॅरेज कार्डसोबतच एक एंट्री कार्ड दिले आहे.
प्रतिमासाठी वाराणसीतून घेतला लेहंगा-चुडीदार
- प्रतिमा वाराणसीचीच आहे, त्यामुळे तिला तेथील बनारसी शालू आणि खास लेहंगा चुडीदार घेतला आहे.
- इशांत शर्मा 1 नोव्हेंबर रोजी आपली होणारी पत्नी प्रतिमा सिंग आणि मेहुणा विक्रांतसमवेत अचानक गंगा आरतीसाठी वाराणसीत पोहचला होता.
- जून महिन्यात दोघांची यंगेजमेंट दिल्लीत झाली होती.
इशांतच्या लग्नाला युवी-हेजल जाणार-
- दिल्लीजवळील गुरगावमध्ये होत असलेल्या इशांतच्या लग्नाला नुकतेच लग्न झालेले कपल युवराज-हेजल जाणार आहे.
- याशिवाय एमएस धोनी आणि सुरेश रैना पत्नीसमवेत लग्नाला हजर असतील.
- इशांत व प्रतिमाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित केले आहे. वेळ मिळाला तर आपण अवश्य हजर राहू असे मोदींनी त्यांना सांगितले होते.
- मोदी आज दिल्लीतच आहेत त्यामुळे कदाचित ते इशांतच्या लग्नाला पोहचू शकतात. कारण प्रतिमा वाराणसीची आहे व स्थानिक खासदार या नात्याने मोदींनी हजर रहावे अशी प्रतिमाच्या वडिलांनी इच्छा बोलून दाखवली आहे.
पुढे पाहा, इशांत-प्रतिमा यांच्या लग्नाच्या तयारीचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...