आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricketer Ishant Sharma\'s Sister In Law Narrates His Love Story With Pratima Singh

होणाऱ्या पत्नीने आणि मेहुणीने सांगितले, कशी रंगली इशांतची लव्ह स्टोरी- पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठी बहीण अकांक्षासह प्रतिमासिंह. - Divya Marathi
मोठी बहीण अकांक्षासह प्रतिमासिंह.
वाराणसी- क्रिकेटर इशांत शर्माने रविवारी वाराणसीच्या शिवपुर येथेल राहणाऱ्या इंटरनेशनल बास्केटबॉल प्लेयर प्रतिमासिंहसोबत साखरपुडा उरकला. प्रतिमाला एकूण पाच बहिणी आहेत. यांत प्रतिमा ही सर्वात छोटी आहे.यावेळी प्रतिमा आणि तिची बहिन दिव्यासिंह यांनी या लव्ह स्टोरी विषयी dainikbhaskar.com सोबत बोलताना अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
3 वर्षांपूर्वीच सुरू झाली होती लव्ह स्टोरी, जाणून घ्या कशी झाली पहिले भेट
- प्रितीमाची मोठी बहीण दिव्या हिने बोलताना सांगितले की, 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या एका बास्केटबॉल स्पर्धेत इशांत चीफ गेस्ट म्हणून आला होता. तेथेच त्याची ओळख प्रतिमासोबत झाली."
- "इशांत जीजूंना जेव्हा वेळ असायचा तेव्हा, ते प्रतिमाची मॅच पाहण्यासाठी येत. साधारणपणे एकवर्षे यांच्यातील गप्पा गोष्टी सुरूच होत्या. अशीच यांची जवळीक वाढत गेली."
- "प्रतिमादेखील कधी-कधी इशांतचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर जात असे. एवढेच नाही तर दिव्याने हसत-हसत, इशांत तिला ब्यूटी क्वीन म्हणून संबेधतो." असेही सांगितले.

खरेतर पहिल्याच नजरेत पडले प्रेमात
- सिंह कुटुंबातील दुसऱ्या क्रमांकाची मुलगी असलेल्या दिव्याने, "इशांत आणि प्रतिमा यांची लव्ह स्टोरी लव्ह अॅट फर्स्ट साइट सुरू झाले होते. हे खुद्ध इसांत जीजूनेच सांगितले असल्याचेही तिने सांगितले."
- इशांतची होणारी पत्नी प्रतिमा हिने सांगितले की, "इशांतचे नेचर मला पहिल्याच भेटीत आवडले होते. त्याने पहिल्याच भेटीनंतर माझा संपूर्ण सामना पाहिला होता. तेथूनच आमच्या मैत्रीला सुरूवात झाली आणि लवकरच या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले."

ग्लॅमरमध्ये सानिया-साइनापेक्षा सरस आहे प्रतिमा
- प्रतिमाच्या इंटरनॅशनल बास्केटबॉल करिअरला 2006 पासून सिंगापूर येथून सुरूवात झाली.
- तिने सांगितले की, एका इंटरनॅशनल वेबसाइटने तिला ग्लॅमरस स्पोर्ट्स प्लेयर्सच्या बाबतीत टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालपेक्षाही अधिक पॉइंट्स दिले होते.
पाचही बहिणी खेळाडू..
- वाराणसीमध्ये या बहिणींना सिंह सिस्टर्स नावाने ओळखले जाते.
- प्रतिमाप्रमाणएच दिव्या (34 वर्षे), प्रशांती (32 वर्षे) आणि आकांक्षा (26 वर्षे) बास्केटबॉलशी संलग्न आहेत.
- दिव्या सिंह अंडर-16 मेन्स टीमच्या कोच आहेत.
- तर प्रियंका सिंह नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये बास्केटबॉल कोच आहे.
- प्रशांती इंडियन वुमन बास्केटबॉल टीमची कर्णधार आहे. तर आकांक्षा टीम मेंबर आहे.
- सिंह सिस्टर्सवर चित्रपटाची कथा लिहिली जात असून लवकरच त्यांच्यावरील चित्रपट पडद्यावर येणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इशांतच्या होणाऱ्या ग्लॅमरस पत्नीचे, मेहुण्यांचे आणि ससुरवाडितील लोकांचे खास Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...