स्पोर्ट्स डेस्क- ‘हा काळा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीन काळ आहे, मी अत्यंत कठीन परिस्थितीतून जात आहे, मात्र मी येथे थांबण्यासाठी आहे. संघर्ष सोडणार नाही.’ हे उद्गार आहेत इंग्लंडचा स्टार क्रिकेटर जेम्स टेलरचे. त्याला ह्रदयाच्या आजारामुळे अवघ्या 26 व्या वर्षीच क्रिकेटला अलविदा करावा लागला.
या आजारामुळे लागला कारकीर्दिला ब्रेक...
- टेलरला एराइथमॉजेनिक राइट वेन्ट्रिक्यूलर एराइथमिया (एआरवीसी) हा आजार झाला आहे. जेम्सला तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तो लवकरच सर्जरी करणार आहे.
- साधारणपणे याच प्रकारच्या आजाराणे 2012 मध्ये माजी फुटबॉलपटू फॅब्रिस मुआम्बाचे फुटबॉलच्या मैदानातच निधन झाले होते.
- जेम्सने व्हायरल इन्फेक्शनमुळे मागच्याच आठवड्यात कॅम्ब्रिज एमसीसीयूविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली होती.
- जेम्स टेलरने त्याच्या कारकीर्दीत 7 कसोटी आणि 27 वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेत्रृत्व केले आहे.
ट्राय सीरीजमध्ये खेचला होता भारताचा विजय
- हो, जेम्स टेलर तोच क्रिकेटर आहे, ज्याने 2015 मधील एका ट्राय सीरीजमध्ये भारताच्या हाता तोंडाशी असलेला विजय खेचून इंग्लंडला अंतीम सामन्यात पोहोचवले होते.
- भारताने दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने केवळ 66 धावांवर 5 गडी गमावले होते.
- तेव्हा इंग्लंड संघ बॅकफूटवर असताना टेलरने बटलरच्या साथीने 125 धावांची भागिदारी करत इंग्लंडला विजयी केले होते.
- 125 पैकी 82 धावा या जेम्स टेलरने केल्या होत्या. टेलर याचवर्षी दक्षिण आफ्रिकेला टेस्ट सीरीज मध्ये 2-1 ने पराभूत करणाऱ्या संघाचा भाग होता.
- तेव्हा तो म्हणाला होता की, ही खेळी माझ्या आयुष्यातली अविस्मरणीय खेळी आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दिग्गज क्रिकेटर्सचे ट्वीट्स आणि जाणून घ्या जेम्स टेलरशी संबंधित काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स...