आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-9: हा आहे भारताचा ज्यूनिअर ख्रिस गेल, जाणून घ्या कशामुळे असतो चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या फटकेबाद खेळीमुळे महिपाल लोमररला इंडियन ख्रिस गेल असे संबोधले जाते. - Divya Marathi
आपल्या फटकेबाद खेळीमुळे महिपाल लोमररला इंडियन ख्रिस गेल असे संबोधले जाते.
स्पोर्ट् डेस्क- युवा खेळाडूंसाठी IPL म्हणजे एक सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. या वेळीही अनेक युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचीच नजर राहिल. यापैकी एक आहे अंडर 19 संघाचा स्टार क्रिकेटर महिपाल लोमरर. राजस्थानसाठी घरगुती क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूला जूनिअर ख्रिस गेल असेही संबोधले जाते.
कोचने दिले होते हे नाव...
- हार्ड हिटिंग बॅट्समन असल्याने 16 वर्षांच्या महिपालची तुलना वेस्ट इंडीज संघाचा खेळाडू ख्रिस गेलशी होत होती.
- त्याला हे नाव कोच चंद्रकांत पंडित यांनी दिले आहे.
- लोमरर म्हणतो, ‘2011 मध्ये अम्ही मुंबई येथे खेळण्यासाठी गेलो होतो. त्या अंडर-14 स्पर्धेत मी राजस्थान संघाकडून खेळताना अंतिम सामन्यात 250 धावा केल्या होत्या’.
- ‘तेव्हा माझे कोच चंद्रकात पंडित यांनी माझी बॅटिंग पाहून मला जूनियर ख्रिस गेल असे संबोधले होते. यानंतर सर्वजन मला याच नावाने हाक मारत.’
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स
- महिपाल ऑलराउंडर आहे. तो फलंदाजी करताना एक चांगला फिनिशर म्हणूनही प्रसिद्ध आहे. तो स्पिनरही आहे. पुर्ण 10 ओव्ह फेकू शकतो.
- अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये न्यूझिलंडविरुद्ध त्याने मॅच विनिंग खेळी साकारली होती. त्यासाठी त्याला सामनाविराचा किताबही मिळाला होता. या सामन्यात त्याने 45 धावा करत 5 बळीही मिळवले होते.
- बॅटिंगमध्ये माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अॅडम गिलक्रिस्ट महिपालचा रोल मॉडेल आहे. तर, बॉलिंगसाठी न्यूझिलंडचा डॅनियल विट्टोरी आणि भारताचा रवींद्र जडेजा यांचा तो चाहता आहे.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, महिपाल लोमररचे काही खास फोटोज....