आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricketer Mohammad Shami Again Shared A Photo With His Wife Hasin Jahan.

क्रिकेटर शमीने पुन्हा शेयर केला पत्नीसोबतचा ग्लॅमरस फोटो, मिळाल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- मागील महिन्यात पत्नीचा फोटो शेयर केल्यानंतर ट्रोलर्सचा शिकार बनलेला क्रिकेटर मोहम्मद शमीने रविवारी नव्या वर्षानिमित्त आपला पत्नीसमवेतचा पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटो शेयर केला. या फोटोसोबतच त्याने एक शायरी लिहित नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, काही लोकांना शमीने शेयर केलेला फोटो पुन्हा आवडला नाही. काहींनी त्याला धर्मावरून ज्ञान पाजळले. काय लिहले शमीने...
 
- नव्या वर्षानिमित्त पहिल्याच दिवशी शमीने वाइफसोबतचा आणखी एक फोटो शेयर केला. ज्यात त्याने पत्नीच्या कमरेवर हात ठेवला आहे.
- हा फोटो शेयर करताना शमीने लिहले की, 'ना साथी है ना हमारा है कोई, ना किसी के हम, ना हमारा है कोई, पर आपको देखकर कह सकते हैं, एक प्यारा हमसफर है कोई' Happy New Year.
- हा फोटो टि्वट करताच शमी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला.
- अनेक कट्टरवादी लोक या फोटोवरून त्याच्यावर टीका करत आहेत तसेच धर्माचे ज्ञान पाजळत आहेत.
- अनेक लोकांनी टि्वट केले की, शमी आपल्या पब्लिसिटीसाठी पत्नीसमवेतचे फोटो पुन्हा पुन्हा शेयर करत आहे.
- तर काही शमीच्या समर्थनात आले आहेत व त्याला एक प्रोग्रेसिव पर्सन म्हणत आहेत.
- याआधी 23 डिसेंबर रोजी शमीने वाइफसोबतचा एक फोटो शेयर केला होता. ज्यात त्याची पत्नी स्लीवलेस ड्रेसमध्ये दिसत होती त्यावेळी तो कट्टरपंथीय लोकांच्या निशाण्यावर आला होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शमीचा पत्नीसोबतचा फोटो शेयर केल्यानंतर कशा कशा आल्या कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...