आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साक्षी-जीवासोबत हमर ड्राईव्ह करत घरी पोहचला धोनी, फॅन्सनी घेतल्या सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एयरपोर्टमधून आपली मुलगी आणि पत्नीसमवेत बाहेर पडताना एमएस धोनी - Divya Marathi
एयरपोर्टमधून आपली मुलगी आणि पत्नीसमवेत बाहेर पडताना एमएस धोनी
रांची- महेंद्रसिंग धोनी चेन्नईमध्ये आपल्या फ्रेंचायजीची मॅच पाहून पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासमवेत रांचीत दाखल झाला. सोमवारी सायंकाळी तिघे बिरसा मुंडा एयरपोर्टवर उतरले. तेथून धोनी आपली हमर कार स्वत: चालवत सरळ घरी गेला. एयरपोर्टवर लोकांनी धोनीसमवेत सेल्फी घेतले. धोनीला पाहून जमली लोकांची गर्दी....
- धोनीला लोकांनी जसे एयरपोर्टवर पाहिले तेथील लोक आणि टर्मिनल बिल्डिंगच्या कर्मचा-यांनी त्याचे फोटो घेण्यास सुरुवात केली. काहींनी सेल्फी घेतल्या.
- माहीने सुद्धा फॅन्सला निराश केले नाही आणि त्यांच्यासमवेत फोटो काढले. सोबतच हात हालवत अभिवादन स्वीकारले.
- टर्मिनल बिल्डिंगमधून प्रथम साक्षी बाहेर आली त्यानंतर धोनी मुलगी जीवाला घेऊन बाहेर आला. त्यानंतर धोनी स्वत: हमर ड्राईव्ह करत आपल्या घरी पोहचला.
रविवारी पाहिली चेन्नईयन एफसीची मॅच-
- क्रिकेट मैदानापासून दूर असलेला धोनी आजकाल आपल्या परिवारासमवेत वेळ घालवत आहे.
- त्याने रविवारी इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नईयन एफसी आणि नॉर्थ ईस्ट यूनायटेडच्या फुटबॉल मॅचचा आनंद लुटला.
- या दरम्यान त्याच्यासमवेत पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा सुद्धा होती.
- धोनी चेन्नईयन एफसीचा को-ओनर आहे. ही मॅच 3-3 अशी बरोबरीत सुटली.
धोनी आता 15 जानेवारीला मैदावात दिसेल-
- टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनीने 29 ऑक्टोबर रोजी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या मॅचदरम्यान भारताने न्यूझीलंडला हरवून वन डे मालिका 3-2 अशी जिंकली.
- भारत आता पुढील वनडे मॅच 15 जानेवारी रोजी इंग्लंडविरोधात आहे. धोनी तोपर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनी, साक्षी व जिवाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...